पुढच्या वर्षी आयर्लंडचा संघ कसोटी सामना खेळताना दिसण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या मोठ्या काळापासून त्यांचा संघ कसोटी क्रिकेट खेळलेला नाहीये. आयर्लंड संघ पुढच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळच्या ऍशेस मालिकेप्रमाणे पुढच्या वर्षीही इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध पाच किंवा चार दिवसीय कसोटी सामना खेळेल, अशी माहिती समोर येत आहे.
क्रिकेट आयर्लंड आणि इंग्लंड एंड वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्यात पुढच्या वर्षीच्या ऍशेस मालिकेच्या आधी एकमात्र कसोटी सामन्याचे आयोजित करण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. कर्णधार एंडी बालबर्नीचा आयर्लंड संघ मार्च महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध एक कसोटी सामना खेळण्यासाठी तयार आहे. हा कसोटी सामना फेब्रुवारी २०२० मध्ये खेळला जाणार होता, पण काही कारणास्तव तो स्थगित केला गेला होता. अशात आता हा सामना पुन्हा आयोजित केला जाणार आहे. जर श्रीलंकन संघ हा सामना खेळण्यासाठी तयार नसेल, तर पाकिस्तान संघासोबत हा सामना निश्चित स्वरूपात खेळला जाणार आहे.
माध्यमांतील वृत्तात अशी माहिती दिली गेली आहे की, इंग्लंडचा संघ प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या हंगामात सहा कसोटी सामने खेळण्यासाठी प्रतिबद्ध आहे. अशात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेत नेहमीप्रमाणे पाच कसोटी सामने खेळले जातील. म्हणजेच एक सामना अजूनही शिल्लक राहणार आहे. हा राहिलेला एक सामना जून महिन्यात आयोजित केला जाऊ शकतो. ऍशेस मालिकेच्या आधी इंग्लंड कसोटी संघासाठी हा सामना एक सराव सामन्यासारखा असेल.
माध्यमांमध्ये अशीही माहिती समोर आली आहे की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. आयर्लंड संघाला जून २०१७ मध्ये पहिल्यांदा टेस्ट नेशन म्हणून दर्जा दिला गेला होता. पण त्यांनी तेव्हापासून आतापर्यंत फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत. आयर्लंडने त्यांचा शेवटचा कसोटी सामना २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?
अरेरे! दोन खेळाडू रिटायर्ड करूनसुद्धा पदरी शेवटी पराभवच
बाबो! रुटची बॅटपण राहते ‘स्वत:च्या पायावर उभी’, पाहा व्हिडिओ