भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.परंतु तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या इरफानने अनेकदा आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे. परंतु तिच्या चेहऱ्यावर नेहमी मुखवटा असायचा. काही दिवसांपूर्वी इरफानचा मुलगा इमरानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर आता इरफानने भाष्य केले आहे.
इरफानचा मुलगा इमरानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये इरफानची पत्नी सफा बेग हीचा चेहरा ब्लर करण्यात आला होता. ज्यावरून चाहत्यांनी टीका केला होत्या. आता याबाबत इरफान पठाणने ट्विट करत टीका करणाऱ्यांना चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये इरफान पठाण, त्याचा मुलगा आणि पत्नी सफा बेग दिसून येत आहे. हा फोटो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज दरम्यानचा आहे. यात इरफान आणि त्याच्या मुलाने मास्क घातला नाहीये.तसेच सफा बेगच्या चेहऱ्याला अशाप्रकारे एडिट करण्यात आले आहे की,पाहणाऱ्याला वाटेल तिने मास्क घातला आहे. परंतु लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आहे. ज्यामुळे इरफान पठाणवर सर्वच स्तरातून टीका केली गेेली जात आहे.
इरफान पठाणने दिली प्रतिक्रीया
इरफानने तोच फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले की “हा फोटो माझ्या पत्नीने माझ्या मुलाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोवर खूप वाईट प्रतिक्रीया येत आहेत. तिने हा फोटो स्वखुशीने ब्लर केला होता. मी तिचा मालक नाहीये तर जोडीदार आहे. तिचे आयुष्य तिची इच्छा.” या ट्विटने त्याने टीका करणाऱ्यांना चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे.
This picture is posted by my queen from my son’s account. We are getting lot of hate.Let me post this here as well.She blurred this pic by her choice. And Yes,I’m her mate not her master;). #herlifeherchoice pic.twitter.com/Xy6CB2kKWA
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 25, 2021
इरफान पठाण आणि सफा बेग हे दोघेही २०१६ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. सफा बेग ही मध्यपूर्व आशियातील प्रसिद्ध मॉडेल आहे. तर तिचे वडील मिर्झा फारूक बेग हे सौदी अरेबियातील प्रसिद्ध उद्योजक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“पूर्वी १० पैकी ९ युवा खेळाडूंना विराट, सचिन किंवा धोनी बनायचे होते, पण आता बुमराह, शमी झाले आदर्श”
‘उशी कुठंय?’ व्यायामाच्या व्हिडियावर युजरने विचारलेल्या प्रश्नाला ईशांत शर्माचे भन्नाट उत्तर