---Advertisement---

ईशान किशनने केला हार्दिकचा अनोख्या पध्दतीने अभिनंदन; गळाभेट घेत म्हणाला…

---Advertisement---

भारतीय संघ टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचे खूप काैतुक होत आहे. मित्र, नातलग आणि सोबतचे खेळाडू या विजेत्या खेळाडूच्या घरी जाऊन अभिनंदन करत आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्याने देखील टी20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी केली होती. यानंतर हार्दिक पांड्या आयसीसी क्रमवारीनुसार अष्टपैलू च्या रँकिग मध्ये अव्वल स्थानी पोहचला. दरम्यान पांड्याचा जोडीदार ईशान किशन त्याला अभिनंदन करण्यासाठी मध्ये  त्याच्या घरी गेला आणि त्याने हार्दिक पांड्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यंदाच्या टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्याच्या शानदार कामगिरीला त्याचा साथी ईशान किशने सलाम केला. शुक्रवारी (5 जुलै) ईशान हार्दिकच्या घरी जाऊन त्याची अचानक भेट घेतली आणि त्याच अभिनंदन केला. ज्याचा व्हिडिओ ईशानने आपल्या खात्यावरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही खेळाडूंना प्रेमळपणे मिठी मारताना दिसत आहे, त्यानंतर ईशाननेही हार्दिकचे प्रेमाने चुंबन घेतले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये ईशान किशनने कॅप्शनमध्ये लिहले की, “गेल्या काही महिन्यांत तुला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला तरीही तु शांत आणि लक्ष केंद्रित केले. आणि आज भैया तुला तुझ्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ मिळाले आहे. मला अजून खूप काही वाटत आहे आणि सांगायचे आहे पण शब्द कमी पडतील. तु खरोखरच चॅम्पियन आणि दुर्मिळ आहेस.

हार्दिक पांड्याची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत शानदार होती. विशेषत: अंतिम सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिका 16 षटकांत 151-4 अशी मजबूत धावसंख्या होती. त्यानंतर हार्दिकने 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोकादायक दिसणाऱ्या हेनरिक क्लासेनला 52 धावांवर बाद केले. यानंतर त्याने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 16 धावा वाचवण्याचे आव्हान अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केले आणि भारताला 169/8 वर रोखून विजय मिळवून दिला. संपूर्ण स्पर्धेत हार्दिकने 48 च्या सरासरीने 144 धावा केल्या आणि 17.36 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या.

महत्तवाच्या बातम्या-

मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!
हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजची ‘विक्ट्री परेड’, या पध्दतीने झाले जंगी स्वागत
कचऱ्याची गाडी पाहून लगावले पाकिस्तान पाकिस्तानचे नारे! भारताच्या विजयी रॅलीतला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---