भारतीय संघा जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. उभय संघांतील टी-20 मालिका 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाईल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या टी-20 मालिकेत नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल. हार्दिक आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी पहिल्या सामन्यात संघ निवडणे सोपे नसेल. संघाकडे सलामीवीर फलंदाजांचे एक नाही, तर चार पर्याय आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांसारखे दिग्गज फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळत नसल्यामुळे हार्दिकपुढे मोठे आव्हान असेल. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे आणि प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी त्याला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. रोहित आणि केएल राहुल भारताचे नियमित सलामीवीर आहेत. मात्र, हे दोघेही या मालिकेत खेळत नाहीयेत. असात संघाकडे सलामीसाठी चार प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. वर्षातील या पहिल्याच मालिकेत भारतीय संघात चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
ईशान किशन (Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad), राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल हे युवा सलामीवीर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहेत. आता या चौघांपैकी कोणत्या दोघांना सालामीची संधी मिळते, हे मात्र पाहावे लागणार आहे. ईशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल, अशी पूर्ण शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड देखील या स्पर्धेत आघाडीवर आहे. ऋतुराज, राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांचा सध्याचा फॉर्म पाहता, ऋतुराज इतर दोघांपेक्षा आघाडीवर दिसत आहे. अशात ईशान आणि ऋतुराज श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सलामीवीराच्या रूपात खेळू शकतात.
संघात तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव () खेळणार हे, जवळपास निश्चित मानले जात आहे. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी संजू सॅमसन दावेदार आहे. अष्टपैलूंमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षल पटेल यालाही निवडले जाऊ शकते. संघात फिरकी गोलंदाजाच्या रूपात एकट्या युझवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळू सकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना मुख्य वेगवान गोलंदाजांच्या रूपात निवडले जाऊ शकते.
या भारतीय संघातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक , शिवम मावी, मुकेश कुमार. (It will be a challenge for Hardik Pandya to select the playing XI for the first T20 match against Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीन ड्रायव्हर घरी बसवून एकटाच निघालेला रिषभ पंत, माजी प्रशिक्षकांनी केली फिटनेससाठी प्रार्थना
अमेरिकेत बेसबॉलच्या लोकप्रियतेत घसरण, भारतीय वंशाचे बिजनेसमॅन क्रिकेटसाठी करणार 1000 कोटींची गुंतवणूक