22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान ईडन गार्डन (Eden Garden), कोलकाता (Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (india vs Bangladesh) संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test Match) पार पडणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना (Day-Night Test Match) असणार आहे.
भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहेत. या सामन्यात गुलाबी चेंडूचा (Pink Ball) वापर केला जाणार आहे.
गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा (Red Ball) जास्त स्विंग करतो. परंतु, गुलाबी चेंडू जुना झाल्यानंतर मैदानावर दव असतानाही कसा काम करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला आहे.
“हा कसोटी सामना मनोरंजक (Interesting Match) असणार आहे. काल (13 नोव्हेंबर) मी गुलाबी चेंडूने सराव केला आहे. हा गुलाबी चेंडू लाल चेंडूच्या तुलनेत जास्त स्विंग करत होता. कारण, त्याच्यावर अतिरिक्त आवरण होते जे लवकर घासले जात नाही,” असे विराट म्हणाला.
“गुलाबी चेंडूने खेळताना खेळपट्टीत जिवंतपणा राहणे महत्त्वाचे आहे,” असेही विराट म्हणाला.
भारतीय संघाची बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाने गुलाबी चेंडूने सराव केला होता. परंतू भारतीय संघाने दिवसा सराव न करता संध्याकाळी सराव सत्राचे आयोजन केले होते.
या सरावादरम्यान नव्या चेंडूबरोबर सामंजस्य बसवण्यासाठी फलंदाजांनी थ्रोडाउनवर सराव केला. असे असले तरी सध्या पहिल्या सामन्यावर केंद्रित केले पाहिजे, असे विराटने स्पष्ट केले आहे.
“कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही तुमचे लक्ष एका सत्रासाठी किंवा एका षटकासाठी विचलित होऊ देऊ शकत नाही. सध्या आमचे पूर्ण लक्ष गुरुवारी सुरु होणाऱ्या सामन्यावर असले पाहिजे. त्यानंतर आम्ही दिवस-रात्र कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करू,” असे विराट म्हणाला.
९ वर्षांनंतर रहाणे सोडणार राजस्थान रॉयल्सची साथ, या संघात होऊ शकतो समावेश
वाचा ???? https://t.co/FqOZMKUCjf ???? #म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 14, 2019
भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशची फलंदाजी गडगडली!
वाचा????https://t.co/OWsLMuLKiD????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 14, 2019