इंग्लंडविरुद्ध भारत संघात नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना बुधवारपासून (४ ऑगस्ट) खेळला जात आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावानंतर इंग्लंडवर ९५ धावांची आघाडी घेतली. या सामन्यात पहिल्या डावात भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली ती भारतीय संघासाठी खूप प्रभावी ठरली. त्यातही जसप्रीत बुमराहने खेळलेल्या काही आक्रमक फटक्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ९ विकेट्स गेल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने अखेरच्या विकेटसाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना सतवलं. बुमराहने यावेळी काही आक्रमक फटके खेळले. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली आणि भारताची आघाडी ९५ धावांपर्यंत वाढवली. अखेर रॉबिन्सनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बुमराहने आपली विकेट गमावली. त्याने ३ चौकार आणि १ षटकारासह २८ धावा केल्या. मोहम्मद सिराज ७ धावांवर नाबाद राहिला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होतोय प्रचंड ट्रोल
बुमराहने जरी त्याच्या फलंदाजीने लक्ष वेधले असले तरी, या डावात भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहे आणि बुमराहची फलंदाजी पाहिल्यानंतर आता तो आणखी ट्रोल होऊ लागला आहे. सोशल मीडियावर बुमराहची तुलना विराट कोहलीशी केली जात आहे. काही लोकांनी सांगितले असे की, “बुमराहने इंग्लंडच्या गोलंदाजांचा विराट कोहलीपेक्षा चांगला सामना केला आहे.”
विराटशिवाय चेतेश्वर पुजारा ४, अजिंक्य रहाणे ५ आणि रोहित शर्मा ३६ धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर अनेक मजेशीर ट्विट देखील केले आहेत.
Bumrah to kohli , Pujara & Rahane 😂 pic.twitter.com/XXxWzARDmM
— 🔥T . O . M . A . L 🔥😎 (@samaj_premi) August 6, 2021
#engvsind #cricmbs41 #cricket #bumrah #kohli #testcricket pic.twitter.com/KJEgOOsFmt
— Mahendro Cosmos (@mahendrocosmos) August 7, 2021
https://twitter.com/Roronoa_Yuvi/status/1423660492006985732
https://twitter.com/GoatMahi7/status/1423658673985900550
Bumrah in this test be like:#Bumrah #BCCI #ENGvIND pic.twitter.com/HKRuQ1TG5f
— Nitin (@16nitinn) August 6, 2021
Playing better than the captain 🙂
Enna mamey 🔥 @imVkohli sambvam epo than pana pora neee #INDvENG
— KARTHIK DP (@dp_karthik) August 6, 2021
#ENGvsIND #ENGvsIND
Rahane, Kohli and Pujara after watching innings of Shami, Bumrah and Siraj 🤣 #Siraj pic.twitter.com/qmfpNzjrht— कुछ भी (Modi ka Parivar) (@Gully_Buoy) August 6, 2021
केएल राहुल आणि रवींद्र जडेजाचे सर्वात महत्वाचे योगदान
भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलने शानदार ८४ धावा केल्या तर, रवींद्र जडेजाने ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताने २८७ धावा केल्या आणि ९५ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात चांगली कामगिरी करु शकलो, केएल राहुलचा खुलासा
“माझे नाव पुन्हा जगासमोर आणण्यासाठी श्रीजेशचे आभार”
मोहम्मद सिराज भिडला इंग्लिश खेळाडूंना; सामन्यादरम्यान स्लेजिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल