रविवारी (29 ऑक्टोबर) भारतीय संघ विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 100 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहित शर्मा याच्यासह मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे महत्वापूर्ण योगदान राहिले. मात्र, विराट कोहली आणि जो रुट यांच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाले. मार्कमी आर्मीने केलेल्या एका पोस्टचे भारत आर्मीकडून सडेतोड प्रत्युत्तरत दिले गेले.
उभय संघातील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 229 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ अवघ्या 129 धावांवर सर्वबाद झाला. रोहित शर्मा याने 101 चेंडूत 87 धावांची सर्वोत्तम खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. सूर्यकुमार यादव यानेही 49 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराला याला 3 विकेट्स मिळाल्या. कुलदीप यादव (2 विकेट्स) आणि रविंद्र जडेजा (1 विकेट) यांनी विजयात महत्वाचे योगदान दिले. भारताचा हा विश्वचषकातील सलग सहावा विजय असून 12 गुणांसह संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. असे असले तरी, विराट कोहली या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाहीत.
विराटसाठी इंग्लंडविरुद्धचा हा सामना निराशाजनक ठरला, असेच दिसते. त्याने 9 चेंडू खेळून एकही धाव न करता विकेट गमावली. विराट कोहली (Virat Kohli) शुन्यावर बाद झालेला पाहून इंग्लंडचे समर्थन करणाऱ्या बार्मी आर्मी या ट्विटर खात्यावरून विराटला ट्रोल केले गेले. या पोस्टमध्ये विराटचा चेहरा आणि खाली बदक असे दाखवले गेले. भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये या पोस्टमध्ये चांगलाची नाराजी पाहायला मिळाली. मात्र, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने अवघ्या काहीच वेळात विराटचा बदला पूर्ण केला. बुमराहने इंग्लंडच्या डावातील पाचव्या षटकात जो रुट (Joe Root) याला गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता) बाद केले. बुमराहने त्याची विकेट घेताच भारतीय संघाचे समर्थक असणाऱ्या भारत आर्मी या ट्विटर खात्यावरून रुटला ट्रोल करणारी पोस्ट शेअर केली. बार्मी आर्मी आणि भारत आर्मी यांच्यातील हे घमासान रविवारी (29 ऑक्टोबर) चर्चेचा विषय ठरले.
Just out for a morning walk pic.twitter.com/Mv425ddQvU
— England’s Barmy Army ???????????????????????????????? (@TheBarmyArmy) October 29, 2023
Just out for an evening walk ???? https://t.co/G0P54UrpRB pic.twitter.com/SugpLAQPbB
— The Bharat Army (@thebharatarmy) October 29, 2023
(Jasprit Bumrah avenged Virat Kohli by dismissing Joe Root for a golden duck)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
महत्वाच्या बातम्या –
वर्षातील सर्वोत्तम चेंडू! बटलरची विकेट पाहून प्रेक्षक पडले कुलदीपच्या प्रेमात, व्हिडिओ तुफान व्हायरल
WORLD CUP 2023 । टॉप 4 नाही, टॉप 7 साठी स्पर्धा; चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे वाढली या संघांची डोकेदुखी