चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. यासह त्यांच्या नावावर सर्वाधिक 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या विक्रमी नोंद झाली. हा विक्रम बाजूला ठेवला, तर या सामन्यात आणखी एक विक्रम रचला गेला. तो विक्रम म्हणजे सर्वाधिक व्ह्युअरशिपचा.
एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांच्या संघाचा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघात मंगळवारी (दि. 23 मे) पहिला क्वालिफायर सामना (First Qualifier Match) पार पडला. तसेच, या सामन्यात व्ह्युअरशिपचे सर्व विक्रम मोडले गेले. चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स सामन्याला 2.5 कोटी व्ह्युअरशिप (Chennai Super Kings vs Gujarat Titans 2.5 Crore viewership) मिळाली. त्यामुळे हा जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक संख्येने पाहिला गेलेला सामना ठरला. चाहते ही महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सीएसके (CSK) संघाची कमाल असल्याचे बोलत आहेत.
Highest peak viewership for IPL 2023 on JioCinema:
CSK Vs GT – 2.5cr.
CSK vs RCB – 2.4cr.
RCB vs GT – 2.2cr.
CSK vs RR – 2.2cr.– CSK the brand! pic.twitter.com/dX3k4r8RGi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2023
What a Man. WHAT A LEGEND.
CSK WON THE MATCH BY 15 runs.
GREAT CAPTAINCY BY THALA.
HIGHEST VIEWERSHIP EVER IN JIOCINEMA, TODAY TOUCHED 2.5cr.
Become the First team to Enter in the Final of IpL 2023 .#CSKvsGT #Cskvgt #Dhoni #IPL2023 #IPLPlayOffs #Ipl pic.twitter.com/uDNXb2Bg32
— KAPIL DEV TAMRAKAR 🇮🇳🚀𝕏🌖 (@kapildevtamkr) May 23, 2023
माध्यमांतील वृत्तांनुसार, जिओ सिनेमा (Jio Cinema) या प्लॅटफॉर्मने फक्त या हंगामात तिसऱ्यांदा आपलाच विक्रम मोडला. तसेच, आयसीसी विश्वचषक 2019दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. पहिल्या क्वालिफायर सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) याच्या ने चेन्नई संघाने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गुजरात संघाला 15 धावांनी पराभवाची धूळ चारत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
यापूर्वी 17 एप्रिल रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याला 2.4 कोटी व्ह्युअरशिप मिळाली होती. तसेच, चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघात 12 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्याला 2.2 कोटी व्ह्युअरशिप मिळाली होती. अशाप्रकारे आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्या पाच आठवड्यात जिओ सिनेमाला 1300 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्युज मिळाले आहेत. हंगामातील अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध कोणता संघ उभा ठाकतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेच, पण त्यासोबतच या सामन्यातही व्ह्युअरशिपचा विक्रम मोडला जातोय का, हेही पाहण्याजोगे ठरेल. (jio cinema breaks all records of digital viewership in qualifier 1 match csk vs gt ipl 2023 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून मुंबईचा बॅटिंगचा निर्णय, लखनऊपुढे ठेवणार का मोठे आव्हान?
मैदानावर जल्लोष, तर लिफ्टमध्ये डान्स! CSKने फायनल गाठताच युवा खेळाडूंसोबत थिरकला ब्रावो, Video पाहाच