इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड लीग खेळणी जात आहे. पुरुषांच्या स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स आणि लंडन स्पिरिट्स हे संघ आमनेसामने आले. मँचेस्टर येथे झालेला हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, मँचेस्टरचा कर्णधार जोस बटलर याने तुफानी फटकेबाजी करत सर्वांचे मनोरंजन केले.
Jos Buttler in "The Hundred".
One of the best ball striker, What a player. pic.twitter.com/vMRv39QhfB
— Johns. (@CricCrazyJohns) August 5, 2023
क्रिकेटच्या या सर्वात नव्या प्रकाराचा दुसरा हंगाम यंदा खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मँचेस्टर संघाने जबरदस्त फटकेबाजी केली. फिल सॉल्ट व बटलर यांनी 24 चेंडूंमध्ये 44 धावा कुटल्या. सॉल्ट 9 चेंडूंमध्ये 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर बटलरने डावाचे सूत्रे आपल्या हाती घेतली.
त्याने सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवत 36 चेंडूंमध्ये 62 धावा तडकावल्या. यामध्ये तीन चौकार व पाच षटकारांचा समावेश होतो. त्याने मारलेले काही षटकार 90 मीटर पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पडले. त्याला बोपाराने त्रिफळाचित केले.
तो बाद झाल्यानंतर काही वेळातच पावसाने व्यत्यय आणला. 80 चेंडूनंतर मँचेस्टर संघाचा डाव 5 बाद 138 धावांवर पोहोचला होता. यामध्ये बोपाराने 2 बळी टिपले. पाऊस न थांबल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(Jos Buttler Hits Blitz Inning In The Hundred For Manchester Originals)
महत्वाच्या बातम्या:
रिटायर झाल्यानंतर ब्रॉडने सांगितले सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजाचे नाव, म्हणाला, “त्याचा रनअपच भारी”
‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा