विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऍडलेड येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सहज पराभूत केले. हा सामना केवळ अडीच दिवसात संपुष्टात आला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मात्र उर्वरित सामने खेळणार नसून पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार आहे. यापूर्वी विराट आणि त्याची पत्नी अनुष्काला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अपत्यजन्मासाठी ऑस्ट्रेलियात येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन पत्रकार अमांडा बेली यांनीही ट्विट करत काहीसा असाच सल्ला दिला आहे.
अमांडा बेली यांनी ट्विट करताना लिहिले, “मला असे वाटते की विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माला इथे घेऊन यायला हवे, जेणेकरून त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म ऑस्ट्रेलियात होईल. शिवाय पुढे जाऊन जर त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतले तर कदाचित २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला एक महान फलंदाज लाभेल.”
त्यांच्या या गमतीशीर ट्विटला उत्तर देताना अनेक चाहत्यांनी देखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट्स मध्ये लिहिले की तुम्हीच ही गोष्ट विराट कोहलीला वैयक्तिकरीत्या मेसेज करून सांगा. तर दुसर्या एका चाहत्याने लिहिले की असे झाले तर २०४० साली ज्युनियर कोहली आणि ज्युनियर स्मिथ अॅशेस खेळतांना आपल्याला दिसतील.
अमांडा बेलीचे ट्विट आणि त्यावरील मजेशीर कमेंट्स-
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1326010944627957760?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1326019967867711489%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ind-vs-aus-australia-journalist-amanda-bailey-suggestions-virat-kohli-and-anushka-sharma-for-his-first-baby-fans-reacted-3696404.html
https://twitter.com/Dev4978/status/1340902437184421890
https://twitter.com/rory_denis/status/1326019967867711489
https://twitter.com/nimisht7/status/1340876905482874880
भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल. या मालिकेतील पुढची कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळविण्यात येईल. या सामन्यात विराट कोहलीशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
– ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार