---Advertisement---

त्यावेळी सिराज हॉटेल रूममध्ये एकटा रडत बसला होता, परंतु मैदानात त्याने कधीच हार मानली नाही

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 1:46 AM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात १२९ धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. परंतु, अनेकांचे असे म्हणणे होते की, या सामन्यात ८ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या मुख्य फलंदाजांना बाद करून भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले होते.

सिराजच्या संघर्षाची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे. एकेकाळी त्याला संघात स्थान मिळवणे देखील कठीण झाले होते. अनेकांना असेही वाटले होते की, कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याच्या कारकीर्दीचा शेवट होईल. परंतु, या सर्व गोष्टींवर मात करत, सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि अप्रतिम कामगिरी करत टीका करणाऱ्यांचे आणि कमी लेखणाऱ्यांचे तोंड बंद केले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याने कारकिर्दीला दिले वेगळे वळण
आयपीएल २०२० स्पर्धेनंतर मोहम्मद सिराजची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी निवड झाली होती. ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सिराज १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत होता. या दरम्यान २० नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. या कठीण कालावधीत तो एकटा पडला होता.

बीसीसीआयने त्याला माघारी परतण्याचा पर्याय दिला होता. परंतु, त्याने माघार घेतली नव्हती. कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी खेळाडू एकमेकांना भेटू देखील शकत नव्हते. पूर्ण दिवस तो हॉटेलच्या रूममध्ये एकटाच बसून असायचा. खेळाडू त्याचे व्हिडिओ कॉल करून सांत्वन करत होते. (Journey of Indian speedster Mohammad Siraj)

अनुभवी गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने मालिकेतील ३ कसोटी सामन्यात सर्वाधिक १३ गडी बाद केले होते. यासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा कारनामा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

योगायोगाने मिळाली संधी आणि केली कमाल; आता ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट करू शकतो केएल राहुल

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रिषभ पंतला बसू शकतो मोठा धक्का, काय आहे कारण? घ्या जाणून

मोहम्मद सिराजला ‘या’ कारणामुळे देण्यात आला नव्हता सामनावीर पुरस्कार, माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---