आयपीएलच्या धर्तीवर प्रथम दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेल्या एसए टी20 लीग या स्पर्धेचा पहिला हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. पहिल्याच वर्षी ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी म्हटले आहे. त्याचवेळी या स्पर्धेतील काही नियम इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील वापरण्यात यावेत अशी मागणी इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक केविन पीटरसन याने केली.
पीटरसन सध्या या स्पर्धेत समालोचन करताना दिसतोय. या स्पर्धेत काही अगदीच नवे नियम वापरण्यात येत आहेत. ज्यामुळे ही स्पर्धा रंजक बनली. आता तेच नियम आयपीएलमध्ये वापरा असा सल्ला पीटरसन याने दिला. तो म्हणाला,
“या स्पर्धेतील काही नियम अत्यंत शानदार आहेत. नाणेफेकीला जाताना 13 खेळाडूंची नावे देत, नाणेफेकीनंतर त्यातून 11 खेळाडू निवडण्याची कल्पना मला आयपीएलमध्ये वापरण्या योग्य वाटते. आपण पाहिले की, बोनस पॉईंटच्या नियमामुळे स्पर्धेत अनेकवेळा रंगत वाढली. हा नियम देखील मला चांगला वाटतो.” याव्यतिरिक्त, जाणीवपूर्वक मारलेल्या थ्रोवर ओव्हर थ्रोच्या धावादेखील देण्यात येणार नाहीत. यासोबतच नो बॉलवर चेंडू स्टम्प्सला धडकल्यानंतर फलंदाजांना धावा घेता येणार नाहीत. असा देखील नियम वापरला जातोय.
पीटरसन याने या मुलाखतीत असे देखील म्हटले की, “मी या स्पर्धेत संघ विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पैसे कमी पडल्याने मी बोली जिंकू शकलो नाही. मात्र, भविष्यात संधी मिळाल्यास मी नक्कीच एखाद्या संघाचा संघमालक होईल.”
या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. त्यानंतर चार संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली. पहिल्या उपांत्य सामन्यात प्रिटोरीया कॅपिटल्स संघाने पार्ल रॉयल्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली. तर, दुसरा उपांत्य सामना जो’बर्ग सुपर किंग्स व सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्या दरम्यान होईल.
(Kevin Pietersen Advice To IPL Thinking About Rules Using In SA T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल
पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा’