भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जात आहे. या सामन्यात केएल राहुलला (KL Rahul) संधी मिळाली नाही. तत्पूर्वी रिपोर्ट्सनुसार लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आयपीएलच्या आगामी हंगामासाठी केएल राहुलला कायम न ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे केएल राहुल आगामी मेगा लिलावात दिसण्याची शक्यता आहे.
2024चा आयपीएल हंगाम संपल्यानंतर लखनऊ राहुलला कायम ठेवणार का, असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्याला स्वतः लिलावात जायचे आहे का? लखनऊ त्याला कायम ठेवेल पण तो यापुढे कर्णधार राहणार की नाही? पण आयपीएलच्या पहिल्या 2 हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर लखनऊ संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिला होता.
आतापर्यंत केएल राहुलने (KL Rahul) एलएसजीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2022च्या हंगामात, तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. 2023 मध्ये दुखापतीमुळे तो 9 सामने खेळून बाहेर पडला होता. पण शेवटच्या हंगामात पुन्हा एकदा त्याने एलएसजीसाठी सर्वाधिक धावा केल्या. राहुलने 14 डावात 520 धावा केल्या होत्या.
राहुलचा धावांचा वेग हा टी20 क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे, पण गेल्या आयपीएलमध्ये त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले होते. सनरायझर्स हैदराबादविरूद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंका मैदानावरच राहुलसोबत चर्चा करताना दिसले आणि ही संपूर्ण घटना टीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. अलीकडे गोयंका यांनी राहुलचे एलएसजी कुटुंबाचा एक भाग असल्याचे वर्णन केले, परंतु राहुलला कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी अद्याप वक्तव्य केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
IND vs NZ; ‘या’ स्टार खेळाडूचा जलवा पाहून गावसकरांनी फिरवले शब्द, म्हणाले…