आयपीएल २०१८मध्ये जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने पंजाबकडून खेळताना आयपीएल दणाणुन सोडली आहे.
९ सामन्यात ४७ च्या सरासरीने ३७६ धावा त्याने केल्या आहेत. याबरोबर तो या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेलाडूंच्या यादीत ६व्या स्थानावर आला आहे. पहिल्या पाचही खेळाडूंनी राहुलपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे.
ख्रिस गेल बरोबर चांगली सलामी देणाऱ्या या खेळाडूला आयपीएलमध्ये पाठीमागच्या काही मोसमात राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागत होते.
Read- अंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी
अशा या खेळाडूच्या जबरदस्त फाॅर्ममुळे त्याचे जगभरातुन चाहते वाढत आहे. यात आता भर पडली आहे ती पाकिस्तानी क्रीडा पत्रकार आणि अँकर जैनब अब्बास.
“लोकेश राहुल प्रभावी, शानदार टायमिंग, पाहण्यात मजा आली.” असे तीने म्हटले ट्विट केले आहे.
ही तीच क्रीडा पत्रकार आहे जीने चॅंपियन ट्राॅफी वेळी ज्या खेळाडूंबरोबर फोटो काढले ते खेळाडू योगायोगाने पुढच्या सामन्यात झिरोवर बाद झाले किंवा फ्लाॅप गेले. यामुळे तिला ट्विटरवर ट्रोलही करण्यात आले होते. परंतु तीने हा सर्व प्रकार अतिशय खिलाडूवृत्तीने तेव्हा घेतला होता.
Read-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
तिला ट्विटरवर १० लाखांपेक्षा जास्त लोक फाॅलोव करतात. त्यामुळे केएल राहुलबद्दल केलेल्या या ट्विटला चांगलेच रिट्वीट मिळाले आहेत.
KL Rahul impressive,superb timing,great to watch.. #RRvKXIP
— zainab abbas (@ZAbbasOfficial) May 6, 2018
Read-अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया, रहाणेकडे संघाचे नेतृत्व