कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची आयपीएल २०२१ च्या मोसमात चांगली सुरुवात झाली नव्हती. संघाने पहिल्या ५ सामन्यांपैकी ४ सामने गमावले होते. मात्र, केकेआरने त्यांच्या सहाव्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत गुणतालिकेत आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. हंगामातील आपला दुसरा सामना खेळणारा २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने जबरदस्त गोलंदाजी केली. एवढेच नव्हे तर, मावीने पंजाबचा फलंदाज ख्रिस गेलचा बळीही मिळवला. मात्र, आता गेल आणि मावी यांच्याबाबतची एक मजेशीर गोष्ट पुढे आली आहे.
मावीची जबरदस्त गोलंदाजी
शिवम मावी आयपीएल २०२१ मधील आपला दुसरा सामना खेळत आहे. याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने आपल्या ४ षटकात १९ धावा देऊन एक बळी मिळवला होता. पंजाब विरुद्धच्या सामन्यातही त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने तुफानी गोलंदाजीचा नमुना सादर करताना आपल्या चार षटकात केवळ १३ धावा देऊन गेलचा महत्वपूर्ण बळी मिळविला. मावीने सलग चार षटके गोलंदाजी केली. त्यापैकी, तीन षटके पावर प्लेमध्ये टाकली गेली.
गेल-शिवमबाबतची मजेदार गोष्ट
केवळ २२ वर्षाचा असलेल्या शिवम मावीने या सामन्यात पंजाबच्या ४१ वर्षीय ख्रिस गेलला गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर बाद केले. गेल आणि मावी यांच्याबाबतची एक मजेशीर गोष्ट म्हणजे मावीचा जन्म होण्यापूर्वी गेलने आपला पहिला प्रथमश्रेणी सामने खेळला होता. मावीचा जन्म २६ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला तर, गेलने प्रथमश्रेणी पदार्पण ऑक्टोबर १९९८ मध्ये केले होते. याचा अर्थ मावीचे जितके वय नाही तितका गेलचा अनुभव आहे.
विश्वचषकातून आला होता प्रसिद्धीझोतात
युवा वेगवान गोलंदाज असलेला शिवम मावी २०१८ सालच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातून प्रसिद्धीझोतात आला होता. कमलेश नागरकोटीसोबत त्याने भारतीय संघाच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व केले होते. न्यूझीलंडमध्ये झालेला तो विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर आयपीएल लिलावात केकेआरने त्याच्यावर कोट्यवधींची बोली लावतात आपल्या संघात सामील करून घेतले.
अशा आहे मावीची कारकिर्द
उत्तरप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मावीने आत्तापर्यंत ६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २२ अ दर्जाच्या सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय २२ टी२० सामने त्याने खेळले असून यात १६ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात एका दिवसात पॅट कमिन्स बनला हिरो, सोशलवर मानले जातायेत आभार; पाहा काही खास पोस्ट
अरेरे! सुनील नारायण शुन्यावर बाद तर झालाच पण गौतम गंभीरच्या या नकोशा विक्रमाची बरोबरीही केली