भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो पदमुक्त होईल. त्याने ट्विटरवरून पोस्ट करत सर्वांना याबाबत माहिती दिली. मात्र, एकूण कामगिरीचा विचार केल्यास विराट हा भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी टी२० कर्णधार ठरतो.
विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार
विराट कोहलीने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी, एकूण आकडेवारीचा विचार केल्यास तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या एक पाऊल पुढे आहे. धोनीने २०१७ मध्ये मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटला नियमित कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विराटने तेव्हापासून आत्तापर्यंत भारताचे ४५ टी२० सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यापैकी २७ सामने भारताने जिंकलेले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताच्या विजयाची टक्केवारी ६० टक्के आहे.
दुसरीकडे धोनीने २००७ ते २०१६ या काळात भारताचे ७२ टी२० सामन्यात नेतृत्व केले होते. त्यापैकी ४१ सामने भारताने जिंकलेले. त्याच्या विजयाची टक्केवारी ५७ टक्के अशी आहे. त्यामुळे एकूण टी२० विजयात विराट धोनीला सरस जातो.
सेना देशातही विराटचा जलवा
सेना देश म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशातही कर्णधार म्हणून विराट धोनीच्या पुढे आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व न्यूझीलंडमध्ये टी२० मालिका विजय मिळवले होते.
वनडे व कसोटीत विराटच राहणार कर्णधार
विराटने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी वनडे व कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तो आपले काम सुरु ठेवेल. विराटच्या जागी टी२० संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. रोहित सध्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार म्हणून भूमिका बजावतो.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/mohammad-kaif-shared-old-video-of-ms-dhoni/
https://mahasports.in/3-players-can-do-most-runs-in-ipl-2021/
https://mahasports.in/sunil-gavaskar-big-statement-on-ashwin-world-cup-selection/