नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी इंग्लंडने २७.४ षटकांत ४ बाद ६६ धावा केल्या आहेत.
हा मालिकेचा तिसरा सामना असुन या सर्व सामन्यात कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. ३ सामन्यातील ६ डावात या खेळाडूने ७३.३३च्या सरासरीने ४४० धावा केल्या आहेत.
याच मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रुट मात्र चांगलाच फ्लाॅप ठरला आहे. ३ सामन्यातील ५ डावात फलंदाजी करताना त्याने केवळ २८.४०च्या सरासरीने १४२ धावा केल्या आहेत. यातही पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ८० धावा केल्या आहेत. यामुळे बाकी ४ डावात त्याने किती खराब खेळ केला याचा अंदाज येतो.
२०१४ला झाले होते याच्या बरोबर उलट-
भारतीय संघाने जेव्हा २०१४मध्ये इंग्लंड दौरा केला होता तेव्हा विराट कोहलीने ५ सामन्यातील १० डावात १३.४०च्या सरासरीने जेमतेम १३४ धावा केल्या होत्या तर तेव्हा रुट मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने ७ डावात १०३.६०च्या सरासरीने ५१८ धावा केल्या होत्या.
तेव्हा हे दोन्ही खेळाडू आपल्या संघाचं नेतृत्व करत नव्हते तर आज हे दोघेही आपआपल्या संघाच नेतृत्व करत असुन फॅब ४ पैकी एक समजले जाते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे
–लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले
–भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ






