टी20 विश्वचषक 2024 मध्ये मोठे मोठे फेर-बदल होताना पहायला मिळाले आहे. भारतीय संघाचे सुरुवातीचे सामने न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळले गेले, टीम इंडिया सलग तीन सामने जिंकून सुपर-8 साठी पात्र ठरले आहे. तर साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना 16 जून रोजी कॅनडा विरुद्ध होणार आहे. हा सामना फ्लोरिडा येथील लॉडरहिल मध्ये होणार आहे. सुपर-8 मधील सामने वेस्ट इंडिज येथे होणार आहेत जेथे पावसाची शक्यता नाकरता येणार नाही.
ताज्या माहितीनूसार गयानामध्ये पावसामुळे दुसरा उपांत्य सामना वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच बरोबर सुपर-8 मधील तिसरा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना देखील पावसामुळे वाहून गेला तर भारतीय संघ अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरण्याची शक्यता आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, भारतीय संघाने सुपर-8 मधील आपले पहिले दोन सामने जिंकल्या आणि तिसरा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर टीम इंडिया दोन्ही सामने जिंकल्याने क्रमवारीत अव्वल असल्याने सेमी फायनल 2 साठी पात्र ठरेल. आणि दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात गयानामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. अश्या स्थितीत दुसरा सेमी फायनल सामना रद्द झाल्यास, टीम इंडिया गट 1 मध्ये अव्वल स्थानी असल्याने टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी (final) थेट पात्र ठरेल.
महत्तवाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केलं, पाकिस्तान कर्णधार बाबर आझवर वादग्रस्त वक्तव्य
इंग्लंडसाठी समीकरण गुंतागुंतीचे, स्कॉटलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर नजर, पाऊस पडला तर पाकिस्तानसारखी परिस्थिती
कोण आहे इरफान पठाणची पत्नी सफा बेग? वयाच्या 21 व्या वर्षीच केले होते लग्न