Loading...

‘कॅप्टन’ कोहलीने दौऱ्यावर जाण्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला दिली ‘ही’ चेतावणी

भारतीय संघ 24 जानेवारीपासून न्यूझीलंड (New ZeaLand)दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी रविवारी (19 जानेवारी) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) झालेल्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सने विजय मिळविला (Won by 7 Wickets) असून 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1ने जिंकली आहे.

त्याचबरोबर मागील वर्षीचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.

ही मालिका जिंकल्यानंतर आता सोमवारी रात्री न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपण न्यूझीलंडवर मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही चांगली कामगिरी करत पहिल्या चेंडूपासूनच दबाव (Pressure On New Zealand) आणणार असल्याचे सांगितले आहे.

भारताने मागीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.

“न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्हाला कशाप्रकारे खेळायचे आहे, याबद्दल आम्ही खूप सकारात्मक होतो, आम्हाला काय करायचे आहे या याबद्दल निश्चितता होती. परदेशात खेळताना जर तुम्ही यजमान संघाला दबावात ठेवण्यात यशस्वी झालात तर तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकता,” असे रविवारच्या सामन्यानंतर विराट म्हणाला.

Loading...

त्याचबरोबर, “यजमान संघ असा विचार करत असतात की आपण आपल्या देशात जिंकले पाहिजे. म्हणून जर आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न केले तर आपण त्यांच्यावर खरोखरच दबाव आणू शकता.”

“मागील वर्षी आम्ही हेच केले होते. आम्ही मधल्या षटकांमध्ये दबाव बनवला, विकेट्स घेतल्या आणि फिरकपटूंनीही चांगली कामगिरी केली. आम्ही यावेळीही अशाच उत्साहाने या दौऱ्यात खेळू,” असेही विराट यावेळी म्हणाला.

त्याचबरोबर कोहली म्हणाला की न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियावर विजय मिळविणे हे महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संघ सोमवारी रात्री न्यूझीलंडसाठी रवाना होईल.

“आम्ही सामना सुरु(ऑस्ट्रेलिया विरुद्धचा) होण्यापूर्वी मैदानावर हीच चर्चा केली, की आम्ही मालिकेच्या शेवटचा सामना खेळत आहोत. तसेच यामध्ये आपण जर विजय मिळवला तर आनंदी वातावरणात आपण न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ. जर पराभव स्विकारावा लागला तर हा एक पराभव होता असा विचार करून याला विसरून जाऊ,” असेही विराट यावेळी म्हणाला.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर 5 आंतरराष्ट्रीय टी20, 3 वनडे सामने आणि 2 कसोटी सामने खेळाणार आहे.

 

Loading...
You might also like
Loading...