fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वीरेंद्र सेहवागच्या घरावर आले टोळधाडीचे संकट, खुद्द सेहवागनेच शेअर केला व्हिडिओ

मुंबई । कोरोनासारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचंच कंबरडं मोडलंय. यातच आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयान संटक उभं ठाकलंय. टोळधाडीचं हे संकट साधसुध नसून त्याचं नुसतं नाव जरी एकलं तर शेतकऱ्याच्या उरात घडकी भरते. आता हे संकट हरियाणातील गुडगावापर्यंत पोहोचलंय.

दरम्यान, भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या घरावर टोळधाडीची झुंड पाहायला मिळाली. सेहवागने त्याच्या घरावरील टोळधाडीचे चित्रिकरण करून सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. टोळधाडीचा हा व्हिडियो अत्यंत भयानक आहे.

मागील महिन्यात मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातल्या अनेक गावात टोळधाडीचे संकट आले आहे. गेल्या काही वर्षात या टोळधाडीच्या आक्रमणात वाढ झाली आहे.

टोळधाड आली म्हणजे अख्खी शेतच्या शेतं नष्ट होतात आणि त्यात शेतकरी पुरता भरडला जातो. टोळधाडीचा थवा उभ्या पिकांचा डोळ्यादेखत फडशा पाडताना बळीराजाला नुसतं त्यांच्याकडं पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. परंतु, नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे.

गुडगावातील ज्वारी, बाजाराच्या शेतीवर ही टोळधाड तुटून पडली आहे. आंब्याच्या झाडाची पाने कुरतडून टाकली आहे. या टोळधाडी नागरिकांच्या घराजवळील झाडांचे देखील नुकसान करत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील शेतीतील उभे पिके उद्ध्वस्त केली आहे.

अनेक भारतीय क्रिकेटर हे देशावर आलेल्या संकाटाच्या वेळी सोशल मीडियावर व्यक्त होतं असतात. तसेच अनेक वेळा मदतीचा हात देखील पुढे करतात. सेहवाग हे यातील सर्वात आघाडीचे नाव.

सेहवागबद्दल थोडक्यात

वीरेंद्र सेहवाग हा भारताच्या सर्वोत्तम फलंदाजापैकी एक. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2013 साली त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्याने भारताकडून खेळताना 104 कसोटी आणि 251 वनडे सामने खेळला आहे. कसोटीमध्ये 47.35 च्या सरासरीने 8586 धावा केल्या. वनडेमध्ये 50.05च्या सरासरीने 8273 धावा केल्या.

सेहवाग 2007 च्या टी 20 अाणि 2011च्या वनडे विश्वचषकातील विजयी संघाचा सदस्य होता. वीरेंद्र सेहवाग कसोटीमध्ये त्रिशतक करणारा पहिला भारतीय आहे. आपल्या कारकिर्दीत दोन त्रिशतक ठोकले आहेत, अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक देखील ठोकले होते.

You might also like