पुणे १३ जुलै २०२३ – लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत विद्याभवन प्रशाला संघाने १४ आणि १६ वर्षांखालील गटात विजय मिळवून पहिल्या दिवसाच्या खेळावर आपली छाप पाडली.
टाटा ऑटोकॉम्पने पुरस्कृत केलेल्या स्पर्धेतील सामने लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरू आहेत. लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत तीन वयोगटातून एकूण ४४ प्रशाला संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा १२, १४ आणि १६ वर्षांखालील गटात होत आहे.
स्पर्धेतील १२ वर्षांखालील गटात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाने विद्याभवन प्रशाला संघावर ३-० असा सहज विजय मिळविला. श्रीजीत भोसलेने १२व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर यश काळेने २२ आणि ३७व्या मिनिटाला गोल केले. विद्याभवन प्रशालेने १४ वर्षांखालील गहटात एसएसपीएमएस प्रशालेचा २-० असा पराभव केला. आयुष वाळुंजने ३५, तर अर्णव भोसलेने ४८व्या मिनिटाला गोल केले.
विद्याभवन प्रशाला संघाने १६ वर्षांखालील गटातही एसएसपीएमएस प्रशालेचा ३-० असा पराभव केला. ओमकारा दाभाडे (२०वे मिनिट), राणा पवार (४३वे मिनिट), प्रणव मैद (५२वे मिनिट) यांनी एकेक गोल केला. त्यापूर्वी लॉयला प्रशालेचे प्राचार्य फादर अनिष, फादर नेल्टन, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, टाटा ऑटोकॉम्पचे कौस्तुभ मेघदुत उपस्थित होते. (Loyal Football Trophy. Dominance of Vidya Bhavan on the first day)
निकाल –
१२ वर्षांखालील – एसएसपीएमएस बोर्डिंग ३ (श्रीजीत भोसले १२वे मिनिट, यश काकडे २०+२रे, ३७वे मिनिट) वि.वि. विद्याभवन प्रशाला ०
१४ वर्षांखालील – विद्याभवन प्रशाला २ (आयुष वाळुंज ३५वे मिनिट, अर्णव भोसले ४८वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०
१६ वर्षांखालील – विद्याभवन प्रशाला ३ (ओमकारा दाभाडे २०वे मिनिट, राणा पवार ४३वे मिनिट, प्रणव मैद ५२वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०
महत्वाच्या बातम्या –
किशनला संधी देताच दिग्गजाने मुरडले नाक, म्हणाला, “आता भारतीय संघ पुढे…”
कृतज्ञ रायडू! ज्या शाळेने घडवले त्या शाळेसाठी केली ही मदत, नक्की वाचा