---Advertisement---

‘या’ कारणाने हार्दिक पंड्या करत नाहिये गोलंदाजी, मुंबईच्या प्रशिक्षकांचा खुलासा

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 8:10 PM
---Advertisement---

आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएल 2021च्या सत्रातील पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करणारा हार्दिक आयपीएलमध्ये गोलंदाजी का केली नाही, असा प्रश्न सतत उपस्थित केला जात होता. आता याबाबत मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी खुलासा केला आहे.

सोमवारी (19 एप्रिल) रोजी महेला जयवर्धने यांनी हार्दिकच्या गोलंदाजी न करण्यामागील कारण सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे या हंगामात सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकणार नाही असे जयवर्धने यांनी सांगितले. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “आपण सर्व या मोसमात त्याच्या गोलंदाजी पाहण्याची वाट पाहत आहोत पण इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याला किरकोळ दुखापत झाली असल्याने तो या दुखापतीतून सावरत आहे.”

हार्दिक पांड्या लवकरच गोलंदाजी करेल अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले की, “आम्हाला सध्या त्यांच्याबद्दल कोणतीही जोखीम घ्यायची नाही. जेव्हा तो गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त होईल तेव्हा त्याला गोलंदाजी करण्यास सांगू. सध्या तो या दुखापतीतून सावरत आहे त्यामुळे मुद्दाम त्याला गोलंदाजी देली जात नाही असे समजू नये. लवकरच तो यातून तंदुरुस्त झाल्यानंतर काही आठवड्यात तो गोलंदाजी करताना दिसेल.”

सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध सामन्यात हार्दिकने डेव्हिड वॉर्नरला धावबाद करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याबद्दल बोलताना जयवर्धने म्हणाले की, “हार्दिकने सीमेजवळ क्षेत्ररक्षण करावे अशी आमची इच्छा आहे कारण त्याचा थ्रो खूप वेगवान आहे आणि तो तिथे त्याने झेलही खूप पकडले आहेत पण खांद्याच्या दुखापतीमुळे आम्ही त्याला 30 यार्डाच्या आतच क्षेत्ररक्षणासाठी ठेवतो.”

महत्वाच्या बातम्या:

भेटा माझ्या हेअरस्टाईलिस्टला! पाहा का म्हणतोय असं राहुल चाहर

मायकल वॉनच्या मते धोनीनंतर हा खेळाडू होऊ शकतो सीएसकेचा कर्णधार

फुटबॉल जगतात आले वादळ, या बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---