---Advertisement---

जगातील फक्त या संघांनी आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 4:46 PM
---Advertisement---

9 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले आणि 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. आयसीसीच्या स्पर्धांमधील बांगलादेशचा हा पहिलाच विजय होता. त्यामुळे त्यांच्यासाठी तो ऐतिहासिक ठरला.

तसेच आयसीसी स्पर्धेचे किमान एकतरी विजेतेपद मिळवणारा बांगलादेश हा 9 वा देश ठरला. याआधी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांनी किमान एकतरी आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

त्यामुळे आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असणाऱ्या (कसोटी दर्जा असणारे देश) एकूण 12 देशांपैकी आता केवळ झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या तीन संघानी आत्तापर्यंत एकही आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही.

1983 चा वनडे विश्वचषक हे भारताचे पहिले आयसीसी विजेतेपद होते. त्यावेळी भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजला पराभूत करत हे विजेतेपद मिळवले होते.

प्रत्येक संघाचे आयसीसी स्पर्धेचे पहिले विजेतेपद –

1973 – इंग्लंड – महिला विश्वचषक (कर्णधार – रॅचेल हेहो-फ्लिंट)

1775 – वेस्ट इंडिज – पुरुष वनडे विश्वचषक (कर्णधार – क्लाईव्ह लॉईड)

1978 – ऑस्ट्रेलिया – महिला विश्वचषक (कर्णधार – मार्गारेट जेनिंग्स)

1983 – भारत – पुरुष वनडे विश्वचषक (कर्णधार – कपिल देव)

1992 – पाकिस्तान – पुरुष वनडे विश्वचषक  (कर्णधार – इम्रान खान)

1996 – श्रीलंका – पुरुष वनडे विश्वचषक (कर्णधार – अर्जूना रणतुंगा)

1998 – दक्षिण आफ्रिका – नॉकआऊट टूर्नामेंट (चॅम्पियन्स ट्रॉफी) (कर्णधार – हन्सी क्रोनिए)

2000 – न्यूझीलंड – नॉकआऊट टूर्नामेंट (चॅम्पियन्स ट्रॉफी) (कर्णधार – स्टिफन फ्लेमिंग)

2020 – बांगलादेश – 19 वर्षांखालील विश्वचषक (कर्णधार अकबर अली)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---