नवी दिल्ली । भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारी २०१५ पासून संघातून बाहेर असून तो सातत्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याला संधी मिळणे कठीण होत आहे.
नुकतेच मनोजच्या (Manoj Tiwary) नावाचा समावेश भारतीय संघाच्या फ्लॉप क्रिकेटपटूंमध्ये केल्यामुळे त्याची पत्नी सुष्मिता रॉय (Susmita Roy) चांगलीच कडाडली आहे.
सुष्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला राग व्यक्त केला आहे. तिने भारतीय संघाच्या फ्लॉप क्रिकेटपटूंची प्रोफाईल बनवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. ती म्हणाली, तुमची हिंमतच कशी झाली.
तिने प्रोफाईलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले पुढे म्हटले, “ज्या कोणी ही प्रोफाईल बनवली आहे, त्याची माझ्या पतीचे नाव घेण्याची हिंमतच कशी झाली?, तुम्ही तुमच्या तथ्यांची तपासणी करा. लोकांबद्दल वाईट आणि व्यर्थ पोस्ट करण्याऐवजी आपल्या बेकार आयुष्यात काहीतरी करा.”
तरी यानंतर चाहत्यांनी तिला अशाप्रकारची पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने म्हटले, जर तुम्ही मोठ्या स्टार खेळाडूची पत्नी असाल, तर तुम्हाला याचा फरक पडता कामा नये. काही चाहत्यांनी, तर असे म्हटले की, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोडो बेकार की बात।”
तिवारीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत १२ वनडे सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत २८७ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतकाचाही समावेश आहे. तर टी२०त त्याने केवळ १५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटमधील ‘अशा’ वाईट घटनांचा धक्कादायक खुलासा गेलने कधी यापुर्वी नव्हता केला
-केवळ महिला पत्रकार असल्यामुळे तिच्याशी नव्हते बोलत कुणी
-या दोन कारणांमुळे रोहितला मिळू शकतो यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार