---Advertisement---

या दोन कारणांमुळे रोहितला मिळू शकतो यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

On: मंगळवार, जून 2, 2020 3:40 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला खेळामधील सर्वात मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. यावर रोहितने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितने (Rohit Sharma) एक व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटले, “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी (Rajiv Gandhi Khel Ratna Award) निवडल्यामुळे मला खूप सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. मी बीसीसीआय (BCCI), सर्व संघसहकारी, सपोर्ट स्टाफ तसेच सर्व चाहते आणि परिवाराचे आभार मानतो.”

यापूर्वी बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले होते, की रोहितची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येत आहे, तर शिखर धवन (Shikhar Dhawan), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि दीप्ती शर्मा (Dipti Sharma) यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येत आहे.

सातत्यपुर्ण कामगिरी-

बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर लिहले होते, की जानेवारी २०१६ते डिसेंबर २०१९ हा काळ विचारात घेऊन पुरस्कारांसाठी नावे मागवली होती. रोहित वनडे आणि टी२० क्रिकेटमधील चांगला खेळाडू आहे. त्याच्या नावावर ३ द्विशतकेही आहेत.

विश्वचषकात चमकदार कामगिरी

एका विश्वचषकामध्ये ५ शतके मारत त्याने इतिहास रचला आहे. २०१९ विश्वचषकामधील कामगिरीमुळे त्याला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले असावे. या व्यतिरिक्त टी२० मध्ये त्याच्या नावे ४ शतके आहेत, तर कसोटी पदार्पणात सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्या नावे २ शतकं आहेत. बीसीसीआयने या सर्वांचा विचार करत रोहितला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत रोहित कर्णधारपद सांभाळत असतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८मध्ये आशिया कप जिंकला होता, तर श्रीलंकेमध्ये झालेली निदाहास ट्रॉफीही भारताने जिंकला होता. यामुळेच रोहितचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. भारतीय संघ त्याच्यावर अबलंबून असतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-फक्त १ सामना नीट खेळले नाही आणि आयपीएलचे कायमचे उपविजेते झालेले ५ संघ

-ज्या सामन्यात विकेटकीपर होते, त्याच सामन्यात विकेट्स घेणारे ३ खेळाडू

-कारकिर्दीतील पहिलाच टी२० सामना गाजवणारे ३ फलंदाज, एक आहे माजी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---