इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. हा सामना हैदराबादने ९ विकेट्स आणि ७२ धावांनी जिंकला. हैदराबादच्या या विजयात वेगवान गोलंदाज मार्को यान्सिन याने मोलाचा वाटा उचलला. त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
यान्सिनने (Marco Jansen) सामन्याच्या दुसऱ्या षटकात बेंगलोरच्या फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत या फलंदाजांना बाद केले. फाफ डू प्लेसिस ५ धावांवर, तर विराट आणि अनुज यांना भोपळाही फोडता आला नाही. बेंगलोर या धक्क्यातून सावरले नाही आणि संघ १६.१ षटकांत ६८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे यान्सिनने सामनावीर (Man of the Match) पुरस्कार जिंकला.
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर यान्सिन म्हणाला, ‘मी गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी या गोष्टी कामी येतात. मी विचार केला होता की पहिला चेंडू टाकल्यानंतर चेंडू चांगला स्विंग होईल, दुसरा चेंडू उजव्या हाताकडे जाणारा होता. मी फाफ आणि विराटच्या विकेट घेतल्या, पण माझ्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज अनुज रावतची विकेट सर्वात चांगली होती. हा माझ्यासाठी सर्वात चांगला स्पेल आहे, जो मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये टाकला आहे.’ यान्सिनने हे देखील सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सदस्य सामने पाहात आहेत.
या सामन्यात बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने १२ आणि सुयश प्रभुदेसाईने १५ धावा केल्या. या दोघांनाच बेंगलोरकडून दोन आकडी धावसंख्या पार करता आली. हैदराबादकडून यान्सिनशिवाय टी नटराजनने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने ८ षटकातच पूर्ण केला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. तसेच केन विलियम्सनने नाबाद १६ धावा केल्या आणि राहुल त्रिपाठीने नाबाद ७ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आमिर खानला हवीये आयपीएलमध्ये संधी, बॅटिंग पाहून तुम्हीच ठरवा मिळेल की नाही
राशिद खानने केला ड्रीम हॅट्रिकचा खुलासा, विराट, बाबरसह ‘या’ फलंदाजाला करायचंय बाद
आयपीएल सुरू असतानाच एमएस धोनी का मागवतोय २ हजार कडकनाथ कोंबड्या? जाणून घ्या कारण