भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज मयंक अग्रवाल अनेक दिवसांपासून भारतीय संघाच्या संघाबाहेर आहे. दरम्यान त्याने महाराजा चषक स्पर्धेत भाग घेतला आहे. मयंक हा कल्याणी बंगलोर ब्लास्टर्स या संगाकूडन खेळताना दिसत आहे. त्याने आपल्या फलंदाजीची शैली दाखवत या स्पर्धेत शानदार शतक झळकावले आहे.
मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने कल्याणी बंगलोर ब्लास्टर्ससाठी सर्वोत्तम फलंदाजीचे दृश्य सादर केले. मयंक 57 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार मारले. मंयकच्या या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याला सामनाविर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
म्हैसूर वॉरियर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सने 20 षटकांत 4 बाद 212 धावा केल्या. कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सकडून मयंक अग्रवाल व्यतिरिक्त देगा निश्चलने 25 चेंडूत 29 धावा केल्या. सूरज आहुजाने 10 चेंडूत 35 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी शुभांग हेगडेने 17 चेंडूत 24 धावा केल्या. अशाप्रकारे कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सच्या संघाला 20 षटकांत 2 बाद 212 धावांपर्यंत मजल मारता आली. म्हैसूर वॉरियर्सकडून जगदीश सुचितने सर्वाधिक 2 बळी घेतले.
कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सच्या 212 धावांच्या प्रत्युत्तरात म्हैसूर वॉरियर्सच्या संघाने 20 षटकांत 202 धावा केल्या. म्हैसूर वॉरियर्स संघाला केवळ 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संघाकडून एसयू कार्तिकने 30 चेंडूत 70 धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि 6 चौकार लावत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 233.33 होता. तसेच रविकुमार समर्थ याने 16 चेंडूत 35 धावा केल्या, तर करुन नायर याने 34 चेंडूर 32 धावांची खेळी केली. दरम्यान मोसीन खान याने कल्याणी बंगलोर ब्लास्टर्स संघासाठी मान्यात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. (mayank agarwal century in maharaja troph)
महत्वाच्या बातम्या-
पोरगा टीम इंडियाचा, नव्या दमाचा! गिलपुढे विराटची फिटनेसही पडली फिकी, Yo-Yo Testमध्ये मिळवले ‘एवढे’ गुण
World Cup 2023साठी गांगुलीने निवडला भारताचा ‘दादा’ संघ, ‘या’ मॅचविनर धुरंधरांची हाकालपट्टी; टाका नजर