लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह इंग्लंड संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ची बरोबरी केली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली अर्धशतकी खेळी करून माघारी परतला होता. त्याला ऑली रॉबिन्सनने बाद केले होते. विराट कोहली ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून माजी इंग्लिश कर्णधाराने त्याची खिल्ली उडवली आहे.
विराटने या सामन्यातील दुसऱ्या डावात ५५ धावांची खेळी केली. तो ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, ते पाहून असे वाटत होते की, तो या डावात मोठी खेळी साकारणार. परंतु, ९० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकला जो बॅटचा कड घेत इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या हातात गेला होता.
विराट ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने त्याची खिल्ली उडवत क्रिकबजशी बोलताना म्हटले की, “हे तर डीव्हीडी सारखे आहे. कारण खेळाडू (विराट कोहली) बाद होण्याची पद्धत एकसारखीच आहे. तुम्हाला माहित आहे की, विरोधी गोलंदाजांची रणनिती काय असणार आहे. ऑली रॉबिन्सनने तर म्हटले होते की, विराटला बाद करण्याची रणनिती सोपी आहे. त्याला चौथ्या आणि पाचव्या स्टंपवर गोलंदाजी करायची आहे. आता हे विराटवर अवलंबून आहे की, तो यावर कसा तोडगा शोधून काढतो.”
विराटला बाद करण्याबाबत रॉबिन्सन सामन्यानंतर म्हणाला होता, “विराटने मला दोन चौकार मारले, त्यानंतर मी त्याला बाद केले होते. विराट विरुद्ध खेळताना साधी सोपी रणनिती आहे. चौथ्या आणि पाचव्या यष्टीवर गोलंदाजी करायची. मी ज्या अँगेलने गोलंदाजी करत होतो,त्यावरून मला वाटत होते की, बॅटचा कडा लागणार आणि तसेच झाले.”
यामालिकेत आत्तापर्यंत विराट जवळपास बाहेर जाणाऱ्या चेंडूवरच अधिकवेळा बाद झाला आहे. विराटने लीड्समध्ये केलेले अर्धशतक हे या मालिकेतील त्याचे वैयक्तिक पहिले अर्धशतक होते.
महत्त्वाच्या बातम्या –
शाकिब अल हसनने निवडला सर्वकालीन वनडे संघ; धोनीला केले कर्णधार, तर या दोन भारतीयांनाही स्थान
रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा