भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. बुधवारी (7 जून) उभय संघांतील ही लढत लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी संघाला अपेक्षित सुरूवातही मिळवून दिली. पण स्टीव स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली. स्मिथ आणि मोहम्मद सिराज यांच्यातील वाद दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि ट्रेव्हिस हेड यांना पहिल्याच दिवशी रोमांचक बनवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांमध्ये 3 बाद 327 धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मिथ 95*, तर हेड 146* धावांसह खेळपट्टीवर आले. दुसऱ्या दिवशीचे पहिले षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj ) आला होता.
या षटकातील चौथ्या चेंडूवर तो स्मिथवर चांगलाच संतापला. सिराज हा चेंडू टाकण्यासाठी धावत आला होता. पण स्मिथने अचानक चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला. फलंदाज खेळपट्टीवरून बाजूला झाल्यानंतर सिराजची धावत येण्याची मेहनत वाया जाणार होता. अशात वेगवान गोलंदाजाचा पारा चढल्याचे पाहायला मिळाला. सिराजने रागाच्या भरात खेळपट्टीवर आल्यानंतर हातातील चेंडू स्टंप्सकडे फेकला. यावेळी स्मिथ आणि सिराजमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले. सिराजचा हा राग पाहून सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
काही चाहते स्टीव स्मिथचे समर्थन करत आहेत, तर काहीजन सिराजचे वर्तन योग्य असल्याचेही बोलत आहेत. गोलंदाज आपल्या पूर्ण ताकदीने चेंडू टाकण्यासाठी येतो आणि अशात फलंदाजाने माघार घेतली, तर गोलंदाज चिडणारच, असेही अनेकांचे म्हणणे आहे. आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर एकापेक्षा एक कमेंट्स येत आहेत. (Mohammad Siraj and Steve Smith clashed in the WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुभमंगल सावधान! प्रसिद्ध कृष्णाही बांधला गेला लग्नबंधनात, नवदाम्पत्याचे फोटो व्हायरल
“विराट कर्णधार नसणे दुःखद, संघात विजयाची भूक नाही”, अभिनेत्याने ट्विट करत व्यक्त केली खंत