२५ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दूसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद हाफिज याने टी२० क्रिकेटमध्ये दमदार विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. Mohammed Hafeez Made World Record In T20 Cricket
काल (३० ऑगस्ट) मॅनचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या दूसऱ्या टी२० सामन्यात हाफिजने त्याच्या टी२० क्रिकेटमधील २००० धावा पूर्ण केल्या आहेत. सोबतच त्याने टी२०तील त्याच्या ५० विकेट्ही पूर्ण केल्या आहेत. यासह टी२० क्रिकेटमध्ये २००० धावा आणि ५० विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
हाफिजने टी२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ९वा क्रमांक पटकावला आहे. तर, असा कारनामा तो दूसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याच्यापुर्वी पाकिस्तानच्या शोएब मलिकने हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
हाफीजने ८९ डावात त्याच्या टी२० तील २००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो टी२०मध्ये सर्वात हळूवारपणे २००० धावा करणारा दूसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर शोएब विराजमान आहे. त्याने टी२० मध्ये तब्बल ९२ डावात २००० धावा पूर्ण केल्या होत्या.
३९ वर्षीय हाफिजला इंग्लंडविरुद्धचा दूसरा टी२० सामना खेळण्यापुर्वी टी२० क्रिकेटमधील त्याच्या २००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ८ धावांची गरज होती. त्या सामन्यात त्याने सुरुवातीलाच दमदार षटकार मारत त्याच्या २००० धावा पूर्ण केल्या होत्या. पूर्ण सामन्यात त्याने ३६ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ चौकारांचा आणि ४ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक
….आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात
एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून