क्रिकेटमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक वेळा आपण खेळताना पाहिले आहे. त्यामध्ये भारताचे हार्दिक- कृणाल पंड्या, राहुल- दीपक चाहर आणि ऑस्ट्रेलियाचे मार्क- स्टीव्ह वॉ यांसारख्या भावंडांचा समावेश आहे. असंच काहीसं आता पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. ते म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळणाऱ्या मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ मोहम्मद कैफबाबत. परंतु कैफ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो, तर शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. कैफ आपल्या वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीसाठीही ओळखला जातो. नुकत्याच देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे तो चर्चेत आला आहे.
मंगळवारी (२४ नोव्हेंबर) बंगाल टी२० चॅलेंज या स्पर्धेमध्ये टाऊन क्लबकडून खेळत असलेल्या कैफने आपल्या शानदार फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. यानंतर शमीने आपल्या भावाच्या तूफानी फलंदाजीचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
शमीच्या भावाने केली तडाखेबंद फलंदाजी
बंगाल टी२० चॅलेंज स्पर्धेत कालिघाट क्लबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या होत्या. हे आव्हान टाऊन क्लबने १९.४ षटकात ७ विकेट्स गमावत १५२ धावा करत पूर्ण केले.
यादरम्यान एकेकाळी कालिघाट संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना टाऊन क्लब १४ व्या षटकापर्यंत ७ विकेट्स गमावत ६६ धावांवर होता. परंतु यानंतर मोहम्मद कैफने अफलातून फटकेबाजी करत डाव पालटून टाकला. त्याने अवघ्या २४ धावांमध्ये ५८ धावा ठोकल्या. यांतील ४८ धावा तर त्याने चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. इतकेच नाही, तर गोलंदाजीतही कैफने कमाल केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत १ विकेट्सही आपल्या नावावर केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
आपल्या लहान भावाच्या या चमकदार कामगिरी शमीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने कैफचा फटकेबाजी करतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/tv/CIAwB4hlTsl/?utm_source=ig_web_copy_link
खरं तर लॉकडाऊनदरम्यान शमीने आपल्या अमरोहा येथील गावात जोरदार सराव केला होता. यादरम्यान त्याचा भाऊ कैफही त्याच्यासोबतच होता. दोघेही शेतात धावत आणि नेट्समध्ये सराव करत होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याला बाद करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील”, दिग्गजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घरचा आहेर
“मी देशासाठी काय केले हे जगाला माहीत आहे”, मलिंगा झाला भावूक
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज