भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहीत शर्मा आणि एमएस धोनी चांगले मित्र आहेत. भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी दोघांनी अनेक सामने एकत्र खेळले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखततीत मोहीत शर्मा धोनीसोबत शुजविषयी नेहमी चर्चा होत असल्याचे सांगितले.
एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. मोहीत शर्मा () याचे सीएसकेच्या यशातील योगदान महत्वाचे आहे. पण दुखापतीमुळे तो दरम्यानच्या काही हंगामात खेळला नाही. त्याने गुजरात टायटन्सकडून यावर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. मोहीतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द देखील जबरदस्त राहिली आहे. धोनीच्याच नेतृत्वात त्याला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. मोहीत चेंडू स्विंग करण्यात माहीर होता आणि धोनीला असे गोलंदाज खास प्रभावित करत. याच कारणास्तव मैदानाबाहेर देखील दोघांमधील संबंध घट्ट बनत गेले.
नुकत्याच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मोहीत शर्मा याने धोनीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी मागच्याच आठवड्यात धोनीशी बोललो. आम्हा दोघांनाही शुज खूप आवडतात. आम्ही जेव्हा कधी आम्ही बोलतो, तेव्हा शुजची चर्चा होतेच. माझा एक मित्र फॉर्मल शुज बनवण्याचे काम करतो. धोनीने त्याच्या एका शुजचा फोटो पाठवला आणि त्याला यायच आकाराचे फॉर्मल शुज हवे आहेत.”
मोहीत शर्मा पुढे म्हणाला की, “धोनी जिथे कुठे जातो, आपली प्रभाव सोडत असतो. हे एवढे अप्रतिम असते की, जर तुम्ही त्याच्याजवळ उपस्थित असाल, तर तुम्हाला जास्त बोलण्याची गरज भासत नाही. तो प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीचा तर्क लावून समजून घेतो, ते पाहून त्याला ऐकत राहावेसे वाटते.”
दरम्यान मोहीत शर्मा भारताच्या 2015 विश्वचषक संघाचाही भाग होता. त्याने भारतीय संघासाठी 26 वनडे आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे फॉरमॅमध्ये त्याला 31, तर टी-20 फॉरमॅटमध्ये 6 विकेट्स मिळाल्या. (Mohit Sharma talks about discussions with MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
राहुलचे आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे कठीण, ईशानला सुवर्ण संधी
VIDEO । श्रीलंकन अष्टपैलूचे हे रुप पहिल्यांदाच दिसले, बहिणीच्या लग्नात हसरंगा भावूक