---Advertisement---

राहुलचे आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे कठीण, ईशानला सुवर्ण संधी

Ishan Kishan
---Advertisement---

बीसीसीआयने 2023 च्या आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केल्यापासून सर्वांच्या नजरा  भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलकडे लागल्या आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की केएल राहुल 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळू शकणार नाही. राहुल न खेळल्यास ईशान किशन खेळणार हे निश्चित आहे.

ईशान किशन (Ishan Kishan) हा आशिया चषक संघातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली. किशनला सुवर्ण संधी आहे. तो पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले केली आहे की, केएल राहुल (KL Rahul) याला कोणतीही सध्या दुखापत नाही. त्याला आयपीयल मध्ये झालेली दुखापतल आता बरी झाली आहे. फक्त त्याला थोडा त्रास आहे. मात्र, राहुलने रिहॅबदरम्यानच्या सरावाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. एका व्हिडिओमध्ये तो विकेटकीपिंगचा सराव करतानाही दिसत होता.

माध्यमातील वृत्तांनुसार, आशिया चषकसाठी संघात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड राहुलवर लक्ष ठेवून होते. मात्र, संघाची घोषणा करताना अजित आगरकरने केएल राहुल आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले होते. अशा स्थितीत ईशान पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे ईशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलामी दिली, मात्र, त्याला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवल्यास तो मधल्या फळीत फलंदाजी करेल. किशनच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 17 सामन्यात 46.27 च्या सरासरीने 694 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने द्विशतक झळकावले आहे. (india vs pakistan in asia cup 2023 kl rahul will not play aginst pakistan ishan kishan could be in playing 11)

महत्वाच्या बातम्या-  
श्रीलंकन संघाला कोरोनाचे ग्रहण! आशिया चषक तोंडावर असताना चार खेळाडूंना कोरोनाची लागण    
ट्रेनिंग कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी गुड न्यूज, वाचा काय-काय घडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---