शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता त्याच्याऐवजी ओएन मॉर्गनकडे कोलकाता संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली आहे. मॉर्गनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे. तो मागील अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली मागीलवर्षी इंग्लंडने पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकला आहे.
मुंबईप्रमाणेच कोलकाताही होणार आयपीएल विजेते?
आता कोलकाताने २०२०च्या आयपीएल हंगामातील उर्वरित ७ सामन्यांसाठी मॉर्गनकडे नेतृत्व सोपवले आहे, त्यामुळे एक खास आकडेवारी समोर येत आहे.
ती आकडेवारी अशी की २०१३ च्या आयपीएल हंगामादरम्यान ३२ व्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार केले होते. त्यावेळी ३२ वा सामना मुंबई विरुद्ध कोलकाता असा झाला होता, म्हणजेच मुंबईचा कर्णधार म्हणून रोहितचा पहिला सामना कोलकाता विरुद्ध झाला होता आणि त्यावेळी कोलकाता गतविजेते होते. पुढे जाऊन मुंबईने त्या हंगामाचे विजेतेपद रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवले.
आता यंदा कोलकाताने नेतृत्व बदल केला आहे. त्यामुळे २०१३ ला मुंबईने केलेल्या नेतृत्वबदलात आणि आताच्या कोलकाताच्या नेतृत्व बदलात काहीसे साम्य दिसून येत आहे. म्हणजेच शुक्रवारी आयपीएल २०२० मधील ३२ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता विरुद्ध मुंबई संघांमध्ये होणार आहे. तसेच हा सामना कोलकाताचा कर्णधार म्हणून मॉर्गनचा पहिला सामना असेल. विशेष म्हणजे मुंबई गतविजेते आहेत. त्यामुळे आताही तसेच घडले तर कोलकाता विजेतेपदाची ट्रॉफी जिंकेल का? हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे.
मुंबई विरुद्धच्या पहिला सामन्यात कोलकाताचे कर्णधार अपयशी
मॉर्गन हा कोलकाताचा ५ वा कर्णधार आहे. याआधी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्यूलम, गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे या चौघांनी कोलकाताचा कर्णधार म्हणून मुंबई विरुद्ध खेळलेला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आता मॉर्गन शुक्रवारी हा इतिहास बदलणार का हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथ ऐवजी बटलर बनणार कर्णधार? राजस्थान रॉयल्सने दिलंय ‘हे’ उत्तर
मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
-आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून तू दिनेश कार्तिकला स्वेच्छेने सूचना देतो का? मॉर्गनने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख –
-टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे