न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघाने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध कडवी झुंज दिली. यावेळी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी अर्धशतक झळकावले खरे, पण ते बाद झाल्यानंतर पुढच्या एकाही फलंदाजाला खास खेळी करता आली नाही. याचे श्रेय भारतीय वेगवान गोलंदाजी फळीतील दोन गोलंदाजांना जाते. ते दोन गोलंदाज इतर कुणी नसून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे आहेत. या दोघांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारताच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
झाले असे की, या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत 160 धावांचा डोंगर उभा केला. तसेच भारतापुढे 161 धावांचे आव्हान दिले. हा डोंगर उभा करण्यात डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) यांच्या अर्धशतकांची मदत झाली. मात्र, हे दोन्ही फलंदाज जेव्हा बाद झाले, तेव्हा न्यूझीलंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. त्यांचे पुढील सर्व फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. यातील तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत.
Innings Break!
A superb show with the ball from #TeamIndia! 💪 💪
4⃣ wickets each for Mohammed Siraj & Arshdeep Singh
1⃣ wicket for Harshal PatelOver to our batters now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/UtR64C00Rs #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/g59Uz7h2eh
— BCCI (@BCCI) November 22, 2022
भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर सिराजनेही 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताने एक विक्रम रचला.
आंतरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या संघांच्या गोलंदाजांमध्ये भारत अव्वलस्थानी पोहोचला. भारताने 2022मध्ये अशी कामगिरी एकदा- दोनदा नाही, तर तब्बल 10 वेळा केली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी ओमान संघ आहे. त्यांनी 2019मध्ये 7 वेळा अशी कामिगरी केली होती. यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी पुन्हा भारत, बांगलादेश, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत.
भारताने 2018मध्येही 6 वेळा 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तसेच, बांगलादेश आणि युगांडा संघांनी 2021मध्ये 6 वेळा ही कामगिरी करून दाखवली होती. तसेच, दक्षिण आफ्रिका संघाने 2022मध्ये 6 वेळा ही किमया करून दाखवली होती. (Most 4+ wicket hauls by team bowlers in a year men’s T20I)
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात संघांच्या गोलंदाजांकडून सर्वाधिक वेळा 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स
10 वेळा- भारत (2022)*
7 वेळा- ओमान (2019)
6 वेळा- भारत (2018)
6 वेळा- बांगलादेश (2021)
6 वेळा- युगांडा (2021)
6 वेळा- दक्षिण आफ्रिका (2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीप अन् सिराजपुढे किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या, मालिका जिंकण्यासाठी भारतापुढे 161 धावांचे आव्हान
विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज…’