मर्यादित षटकांच्या खेळात फलंदाजांकडून धडाकेबाज फटकेबाजी पाहायला मिळते. अशीच जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी स्पर्धा आहे, इंडियन प्रीमिअर लीग. या टी२० लीगमध्ये जगभरातील खेळाडू आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत असतात. सध्या या स्पर्धेचा १५वा हंगाम सुरू आहे. या हंगामातील २५वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने नादखुळा विक्रम केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी कोलकाता संघ फलंदाजीला आला होता. कोलकाताकडून फलंदाजी करताना आंद्रे रसेलने षटकारांची बरसात केली. त्यामुळे त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
आंद्रे रसेलने (Andre Russell) यावेळी फलंदाजी करताना २५ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ४९ धावा झळकावल्या. यावेळी तो शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहिलेला. या धावा करताना त्याने मारलेल्या ४ षटकारांमुळे तो आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने आयपीएमध्ये अखेरच्या षटकात फलंदाजी करताना १६७ षटकार ठोकले आहेत. धोनीनंतर कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १४१ षटकार ठोकले आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी १४० षटकारांसह एबी डिविलियर्स आहे. तसेच, चौथ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने ९० षटकार मारले आहेत. या सर्वांनंतर रसेलचा नंबर लागतो. रसेलने आतापर्यंत एकूण ८९ षटकार मारले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रसेलची आयपीएल २०२२मधील कामगिरी
रसेलने आतापर्यंत यंदाच्या हंगामात ५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४३.३३च्या सरासरीने १३० धावा केल्या. या धावा करताना त्याने १ अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, या धावा त्याने १७३.३३च्या स्ट्राईक रेटने कुटल्या आहेत. यादरम्यानची त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ७५ राहिलीये.
आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१६७ षटकार- एमएस धोनी
१४१ षटकार- कायरन पोलार्ड
१४० षटकार- एबी डिविलियर्स
९० षटकार- रोहित शर्मा
८९ षटकार- आंद्रे रसेल*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चहलच्या पत्नीचा ‘बीहू’ डान्स ठरतोय लक्षवेधी; सोबत रियान परागनेही लावले ठुमके, व्हिडिओ जोरदार व्हायरल
‘मुंबई इंडियन्स अजूनही चॅम्पियन आहे…’ पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवचे सडेतोड प्रत्युत्तर