---Advertisement---

मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज

On: शनिवार, मे 1, 2021 10:54 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंगची फलंदाजी सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चेन्नईने बहारदार फलंदाजी केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढत आहे. या कामगिरीत सर्वात मोठा वाटा आहे तो चेन्नईचा अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिस याचा. डु प्लेसिस सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये असून त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध देखील खेळताना अर्धशतकी खेळी केली आहे.

याबरोबरच त्याने या हंगामातील सलग चौथ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे डु प्लेसिसने आपल्या या अर्धशतकीय खेळी सोबतच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

डु प्लेसिस चेन्नई संघाकडून सलग 4 सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. डु प्लेसिस पूर्वी ऋतुराज गायकवाडने चेन्नईकडून सलग 3 सामन्यात अर्धशतक झळकावले होते. ऋतुराजने ही कामगिरी 2020 मध्ये यूएई येथे झालेल्या आयपीएलमध्ये केली होती. डु प्लेसिसने मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी अनुक्रमे 60 चेंडूत 95, 41 चेंडूत 50 व 38 चेंडूत 56 आशी कामगिरी केली होती.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसिसने 28 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्याने या खेळी दरम्यान 2 चौकार व 4 गगनचुंबी षटकार ठोकले. डु प्लेसिस व अंबाती रायडूच्या अर्धशतकांमुळे चेन्नईला निर्धारित 20 षटकात 218 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नईकडून खेळताना अंबाती रायडूची कमाल! धोनीच्या या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

पंड्या बंधूंचा कौतुकास्पद निर्णय; भारतातील ग्रामीण भागात करणार ‘इतक्या’ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत

रैनाने सार्थ केले ‘मिस्टर आयपीएल’ नाव; मिळवले धोनी, रोहितच्या पंक्तीत स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---