---Advertisement---

१०० कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करणारे ५ खेळाडू

---Advertisement---

क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा एक अवघड प्रकार समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन फलंदाजी करण तर त्याहुन कठीण. ती कसोटी जर परदेशात असेेल तर भल्या भल्या खेळाडूंना टेन्शन येतं.

परंतु जगात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी सलामीला फलंदाजीला येत क्रिकेट गाजवलं आहे. सर्व देशांच्या मिळून ९६५ खेळाडूंनी कसोटीत सलामीला आपलं नशीब आजमावलं आहेत परंतु यातील केवळ १० खेळाडूंना १०० किंवा अधिक कसोटी सामने सलामीला खेळता आले आहेत.

भारतीयांमध्ये केवळ सुनिल गावसकर यांनी १००पेक्षा अधिक कसोटी सामने सलामीला खेळले आहेत. तर सेहवागने ९९ कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे.

२००६ ते २०१८ या काळात इंग्लंडचा महान फलंदाज सर एलिस्टर कूकने सर्वाधिक अर्थात १५४ कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे.

सलामीला फलंदाजी करताना १०० किंवा अधिक सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सरासरी मेथ्थु हेडन (५०.७३) व सुनिल गावसकर (५०.२९) यांची राहिली आहे.

तर सलामीला फलंदाजी करताना केवळ एलिस्टर कूकलाच (११८४५) १० हजार धावांचा टप्पा पार करता आला आहे.

११० कसोटी सामन्यातील १८६ डावात सुनिल गावसकर यांनी सामन्यातील पहिला चेंडू खेळण्याचा विक्रम केला आहे तर ग्रॅमी स्मिथने १०३ सामन्यात १३५ वेळा सामन्यातील पहिला चेंडू खेळला आहे.

सर्वाधिक कसोटी सामने सलामीवीर म्हणून खेळणारे खेळाडू-

१५४- सर एलिस्टर कूक, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १६१

११९- सुनिल गावसकर, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १२५

११६- डेसमंड हेन्स, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- ११६

११४- ग्रॅमी स्मिथ, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- ११७

१०८- माईक अथर्टन, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-११५

१०७- जेफ बाॅयकाॅट, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०८

१०७- सर गाॅर्डन ग्रिनीच, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०८

१०४- मार्क टेलर, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०४

१०३- मेथ्थ्यु हेडन, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-१०३

१००- ग्रॅहम गूच, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-११८

ट्रेंडिंग घडामोडी-

व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक

-क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन

-रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर

100 Test 100 Test wins 100 कसोटी विजय 100 वा कसोटी सामना 5 ODI Legends who had a less successful career in Test Cricket 6- tests-greats-who-got chance in less than 100 ODIs australia Chris Martin cricket cricketers england in marathi india India Vs New Zealand India vs New Zealand Test Series India’s team combination Information information in marathi injury Justin Langer less than 100 ODIs Marathi Information Matthew Hoggard More than 100 tests never played in a World Cup New Zealand New Zealand vs India pakistan records Sir Alastair Cook South Africa team india Test Test Series Tests vvs laxman Wellington West Indies World Cup अरविंद डिसिल्वा इंग्लंड इरापल्ली प्रसन्ना ऍलिस्टर कूक एमएस धोनी ऑस्ट्रेलिया कसोटी कसोटी मालिका काॅलिन कावड्रे ख्रिस मार्टिन ग्रॅहम थोर्प जस्टिन लँगर जस्टिन लॅंगर जेफ बाॅयकाॅट तिलकरत्ने दिलशान दक्षिण आफ्रिका न्यूझीलँड न्यूझीलंड विरुद्ध भारत न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाकिस्तान भारत भारत विरुद्ध न्यूझीलंड भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका भारतीय संघ मराठी माहिती मराठीत माहिती माईक आथर्टन माहिती मॅथ्यू होगार्ड मोहम्मद अझरुद्दीन युवराज सिंग विश्वचषक विश्वचषकात खेळता न आलेले खेळाडू वेलिंग्टन व्हिव्हीएस लक्ष्मण व्हीव्हीएस लक्ष्मण शाहिद आफ्रिदी सर एलस्टर कूक सर क्लाईव्ह लाॅईड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---