एका फलंदाजांकडून एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा अर्थ आहे की, त्या फलंदाजाने मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने त्या मालिकेत इतर फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जेव्हा फलंदाजाला चांगला सूर गवसतो, तेव्हा तो संपूर्ण मालिकेत एका विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करतो. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून त्यांनी दोन वनडे सामन्यात पराभव पत्करून मालिकासुद्धा गमावली आहे. अशातच भारतीय संघ 4 डिसेंबर पासून टी-20 मालिका खेळणार आहे.
आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 21 टी-20 सामने झालेत. भारतीय संघाने त्यापैकी 11 सामने जिंकलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांचे महत्त्वाचे योगदान राहिले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या टी-20 मालिकेत बरेच दिग्गज फलंदाज खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वनडे मालिकेपेक्षा जास्त रोमांच टी-20 मालिकेत पाहिला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या लेखात आपण अशा तीन भारतीय फलंदाजाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये खोऱ्याने म्हणजेच सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
3. शिखर धवन, 117 धावा, (2018-19)
भारतीय सलामी फलंदाज शिखर धवनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणार्या यादीत तिसर्या स्थानी आहे. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2018-19 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. शिखरने त्या मालिकेतील 3 सामन्यातील 2 डावात 117 धावा काढल्या होत्या. यामध्ये शिखरची सर्वाधिक धावसंख्या 76 होती.
2. रोहित शर्मा, 143 धावा, (2015-16)
भारतीय फलंदाज रोहित शर्माने मागील काही वर्षामध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी अप्रतिम आहे. त्यामुळे भारतीय संघाला वनडे मालिकेत आपल्या या फलंदाजाची उणीव खूप भासत आहे. वनडे मालिकेनंतर टी-20 मालिकेत सुद्धा त्याची कमतरता जाणवणार आहे. कारण रोहितचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मध्ये फॉर्म खूप जबरदस्त आहे. 2015-16 साली ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या टी-20 मालिका विजयात रोहित शर्माची कामगिरी दमदार होती. त्यामुळे रोहितने सर्वाधिक जास्त धावा करण्याच्या यादीत दुसर्या स्थानावर आहे. त्याने मालिकेतील 3 सामन्यातील 3 डावात 143 धावा काढल्या होत्या. यामध्ये रोहितची सर्वाधिक धावसंख्या 60 होती.
1. विराट कोहली, 199 धावा, (2015-16)
सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2015-16 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत सर्वाधिक जास्त धावा केल्या होत्या. त्याने 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या तीन सामन्यात विराट कोहलीने 199 धावा केल्या होत्या आणि त्याने तीन ही सामन्यात अर्धशतक ठोकले होते. या मालिकेत त्याने सर्वाधिक 90 धावांची नाबाद खेळी केली होती.
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक