दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात अंतिम सामन्याची रंगतदार लढत झाली. या लढतीत दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. दरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नव्या विक्रमाला गवसणी घातली.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने पावरप्ले संपायच्या आतच शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस आणि अजिंक्य रहाणे यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. पुढे चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी उतरला. अखेर चढ-उतारांचा सामना करत संघाने अंतिम सामन्यात मजल मारली. त्यामुळे पहिल्यांदाच विजेता ठरण्याची संधी हाती आल्यामुळे तिचे सोने करण्याच्या हेतूने अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली.
अय्यरने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेत ४० चेंडूंच्या आतच अर्धशतकी खेळी केली आणि हंगामातील आपल्या ५०० धावा पूर्ण केल्या. यासह अय्यर आयपीएलच्या एका हंगामात दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.
अय्यरपुर्वी शिखर धवनने आयपीएल २०२०मध्ये हा पराक्रम केला आहे. त्याने या हंगामातील एकूण १७ सामन्यात दिल्लीकडून सर्वाधिक ६१८ धावा केल्या आहेत. तर रिषभ पंतने २०१८ साली हा पराक्रम केला होता. त्यावेळी पूर्ण हंगामात त्याने ६८४ धावा केल्या होत्या. तसेच गौतम गंभीर (२००८, ५३४ धावा) आणि धवनने (२०१९, ५२१ धावा) यांच्या नावावरही या विक्रमाची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कहर! एवढी चांगली कामगिरी केलेल्या बोल्टच्या नावावरही झालाय नकोसा विक्रम
IPL FINAL: २०१७ ला मुंबईने केलेला कारनामा आता दिल्लीही करणार का?
नादच खुळा! रोहितच्या मुंबई इंडियन्सने असे असले विरोधी संघांच्या फलंदाजांच्या नाकीनऊ
ट्रेंडिंग लेख-
प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा हा ‘छोटू’ म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे जान!!
दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार
मुंबईची मुलुखमैदान तोफ! ‘यांचा’ वेग पाहून भल्या भल्या फलंदाजांना फुटतो घाम