---Advertisement---

धोनीने पंचांचाच काढला घाम! मुद्दाम घेतला चुकीचा रिव्ह्यू अन् ड्रेसिंग रूमकडे मारली कूच

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 11:05 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी हा डीआरएस घेण्यात माहीर आहे. क्वचितच असे होते, जेव्हा धोनीने डीआरएसची मागणी केली असता ती चुकीची ठरली असेल. त्यामुळे बऱ्याचदा डीआरएसला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ असे देखील म्हटले जाते. परंतु सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीने असे काही कृत्य केले आहे, जे पाहून पंच देखील आश्चर्यचकित होऊन हसू लागले होते.

सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू असताना डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी दीपक चाहर गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटचा चेंडू दीपक चाहरने सरळ चेंडू टाकला, जो फलंदाजी करत असलेल्या राशिद खानच्या पॅडला जाऊन लागला. त्यानंतर धोनीने डीआरएसची मागणी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

दीपक चाहरचा चेंडू सरळ जाऊन राशिद खानच्या पॅडला लागला. त्यानंतर दीपक चाहरने पंचांकडे त्याच्या विकेटसाठी मागणी केली होती. ही मागणी पंचांनी फेटाळून लावली होती. कारण चेंडू बॅटला लागून गेला होता. त्यानंतर दीपक चाहर धोनीकडे गेला आणि त्याला डीआरएस घेण्यास सांगितले. त्यावेळी धोनीला माहीत होते की, फलंदाज नाबाद आहे. तरीदेखील धोनीने डीआरएसची मागणी केली. तो डीआरएस घेतल्यानंतर पंचांनी निर्णय देण्यापूर्वीच ड्रेसिंग रूमकडे जाण्यासाठी निघाला. त्याला असे करताना पाहून पंचांना मात्र हसू फुटल्याचे पाहायला मिळाले.

https://twitter.com/jabjabavas/status/1443603732269187074?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1443603732269187074%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2021-ms-dhoni-calls-for-drs-knowing-it-was-not-out-watch-video-84831

चेन्नईचा हैदराबाद संघावर जोरदार विजय 
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तर अभिषेक शर्माने १८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ आणि फाफ डू प्लेसिसने ४१ धावांचे योगदान देत चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना ६ गडी राखून जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO: केकेआरच्या पदार्पणवीरासाठी शमी ठरला कर्दनकाळ, रॉकेट थ्रोने केले दुर्दैवीरित्या धावबाद

रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू

फक्त कसोटी नव्हे वनडेतही स्म्रीतीचे ऑस्ट्रेलियन भूमीत शतक, हा अद्वितीय विक्रम करणारी पहिलीच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---