इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) च्या हंगामाचे बिगूल वाजले आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. यंदाच्या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार असल्याने आयपीएलचा रोमांच अजून वाढणार आहे. तत्पूर्वी स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ने आयपीएल २०२२ च्या प्रोमोची (IPL 2022 Promo) झलक जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) या प्रोमोमध्ये दिसतो आहे. मात्र या प्रोमोमध्ये तो नव्या अवतारात (MS Dhoni New Look) दिसत आहे.
थाला नावाने आयपीएलप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेला धोनी या प्रोमोमध्ये ट्रक ड्राईव्हरच्या अवतारात दिसत आहे. अंगावर ट्रक ड्राईव्हरसारखा ड्रेस त्याने परिधान केला आहे. त्याने या ड्रेससोबत गळ्यात रूमालही अडकवला आहे, ज्याच्या एका बाजूला मेडल लटकवलेले दिसत आहे. यासोबतच त्याचे केस वाढलेले दिसत आहेत आणि मोठ्या झुपकेदार मिशाही आहेत. तसेच तो हातात लाउड स्पिकर घेऊन उभा असल्याचेही दिसत आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1497547961051811841?s=20&t=QpI4sZ2WuVBJzUpmogUJXQ
Stay Tuned#DhonisNewLook #ComingSoon pic.twitter.com/S17D8L7JPD
— Star Sports (@StarSportsIndia) February 26, 2022
स्टार स्पोर्ट्सने या प्रोमोच्या वेगवेगळ्या क्लिप पोस्ट करत धोनीचा नवा लूक कसा वाटला?, असा प्रश्न चाहत्यांना केला आहे. यावर चाहते कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Think 🆒-ness, think #MSDhoni! 😎#DhonisNewLook #ComingSoon pic.twitter.com/pS9EgGxe8Q
— Star Sports (@StarSportsIndia) February 27, 2022
Thala Dhoni’s cooking up a storm and wants YOU with him – can you guess what he’s pointing to? 🤔#DhonisNewLook pic.twitter.com/hlVqBsVRxu
— Star Sports (@StarSportsIndia) February 27, 2022
दरम्यान ४० वर्षीय धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. तो पहिल्या हंगामापासून सातत्याने आयपीएल खेळतो आहे. आतापर्यंत त्याने २२० आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये ३९.५५ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ४७४६ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघ ४ वेळा आयपीएल विजेता बनला आहे. त्यामुळे यंदाही विजयासह आयपीएल कारकिर्दीची अखेर करण्यावर धोनीच्या संघाचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज, ‘हे’ आहे मोठे कारण
‘धरमशालातील सामना दुपारी चारला खेळवा’, भारतीय दिग्गजाचा कारणासह सल्ला
कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय, ‘आत्तापर्यंत आम्ही २७ खेळाडूंना आजमावले आणि अजून…’