भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी गेले कित्येक महिने क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे 29 मार्चला सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये त्याला खेळताना बघायला क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आयपीएलनंतर ऑक्टोबरमध्ये आयसीसी पुरुष टी -20 विश्वचषक होणार आहे. त्यासाठी धोनीची निवड आयपीएल मधील कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
नुकतेच नवनियुक्त निवड समितीने काल दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरूद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला ज्यात धोनीला स्थान नाही. फिट असलेला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनने पुन्हा संघात प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका 12 मार्चपासून धरमशालापासून सुरू होणार आहे.
सुनील जोशी यांच्या आधीचे निवड समिती अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी आधीच स्पष्ट केले होते की संघाने आता निवडीसाठी धोनीचा विचार केला नाहीये आणि निवडीसाठी प्रथम त्याला देशांतर्गत सामन्यांमध्ये आधी खेळावे लागेल.
धोनी भारताकडून शेवटचा सामना मागीलवर्षी वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरूद्ध खेळला होता, ज्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.
धोनीच्या भारतीय संघातील पुनरागमनाबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या निवडताना धोनीबाबतची कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि सध्याच्या कामगिरीच्या आधारे खेळाडूंची थेट निवड केली गेली.
‘धोनीची पुनरागमन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तो आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करेल आणि धोनीच नव्हे तर इतर अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ खेळाडूंची कामगिरीही पाहिली जाईल. जर त्यांनी देखील चांगला खेळ केला असेल तर त्यांनाही संघात संधी मिळू शकेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
–उपविजेत्या भारतीय महिला संघाबद्दल सर व्हिव्हिअन रिचर्ड्स म्हणाले…
–विश्वचषकाच्या फायनलनंतर ऑस्ट्रेलिया, भारत संघाला मिळाले एवढे करोड रुपये
–ते दोन झेल टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये पडले सर्वात महाग






