चेन्नई सुपर किंग्ज संघाला चार वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा एमएस धोनी पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्यासाठी तयार दिसत आहे. आगामी आयपीएल हंगामात अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि संघांनी आपल्या तयारीली सुरुवातही केली आहे. सीएसकेने देखील आयपीएल 2023 साठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार एमएस धोनी याने नेट सेशनमध्ये फलंदाजीही केली. धोनीला फलंदाजी करताना पाहून चाहते चांगलेच उत्साहित आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊश सध्या पडताना दिसत आहे.
आयपीएल (IPL) जेव्हापासून सुरू झाली (2008) तेव्हापासून एमएस धोनी (MS Dhoni) हा चेन्नई सुपर किंग्जचा एकमेव कर्णधार राहिला आहे. आजपर्यंत खेळल्या गेलेल्या 15 आयपीएल हंगामांमध्ये चार वेळा धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज ट्रॉफीचा मानकरी ठरला. सीएसकेला आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ बनवणारा एमएस धोनी यावर्षी त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळण्याची शक्यता आहे. चाहते देखील धोनीला कारकिर्दीती शेवटच्या दिवसांमध्ये तितकेच प्रेम करताना दिसतात, जेवढे काही वर्षांपूर्वी करत होते.
सीएसकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खेळाडूंच्या सरावाविषयी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहे. संघाने आगामी हंगामासाठी सराव सुरू केला असून धोनीचा सराव सत्रातील एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडिओत काही चेंडूंचा सामना करताना दिसत आहे. चाहत्यांना हाच व्हिडिओ ट्वीटरवर अनेकदा रिट्वीट करून आपली मते मांडली आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसते.
Our Friyay feeling is surely unmatched! 🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/WRZ4HVS8mb
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 3, 2023
यावर्षी आयपीएल आधीप्रामाणे भारतात खेळली जाणार आहे. मागच्या काही हंगामांमध्ये कोरोना साथीमुळे आयपीएल स्पर्धे विदेशात आयोजित करावी लागली होती. अशात चेन्नई सुपर किंग्ज आगामी हंगामापूर्वी त्यांचे होम ग्राउंड चेपॉक स्टेडियवर सराव करत आहे. अशात चेन्नईतीली चाहत्यांना धोनीला यावर्षी लाईव्ह फलंदाजी करताना पाहता येणार आहे. अशात या चाहत्यांपुढे धोनी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करणार की नाही? हादेखील अनेकांना पडलेला प्रश्न आहे. धोनीने मागे सांगितल्याप्रमाणे तो आयपीएलमधून निवृत्ती आपल्या होम ग्राउंडवरच घेणार आहे. अशात आगामी हंगामादरम्यान धोनी कधीही आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल हंगाम आठवणीत ठेवण्यासाठी धोनीकडून देखील चांगल्या प्रदर्शनासाठी अपेक्षित सर्व प्रयत्न केले जातील. (MS Dhoni’s batting in CSK’s net session, video viral on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: ‘ती’ अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र
WPL 2023 । पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सला मोठी झटका, कर्णधार बेथ मुनीची दुखापत चिंताजनक