आयपीएल २०२२ चा ५९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी (१२ मे) खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला आणि सीएसकेला प्लऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. मुंबई चालू हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पहिला संघ आहे. असे असले तरी, मुंबई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्यांनी ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचे त्यांचे आकडे हे इतर कोणत्याही संघापेक्षा खूप उत्तम आहेत.
मुंबई जर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असेल, तर सीएसके देखील आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईनंतर सर्वाधिक म्हणजेच ४ आयपीएल ट्रॉफी सीएसकेच्या नावावर आहेत. पण जेव्हा या दोन बलाढ्य संघांमध्ये तुलना करण्याची वेळ येते, तेव्हा मुंबईचे पारडे थोडे जड वाटते. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. गुरुवारी त्यांनी सीएसकेविरुद्ध इतिहासातील २० वा विजय मिळवला. सीएसकेविरुद्ध २० विजय मिळवणाला मुंबई इंडियन्स पहिला संघ देखील ठरला आहे.
सीएसकेविरुद्ध सर्वाधिक आयपीएल विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत २० विजयांसह मुंबईचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्ज आहे, ज्यांनी १२ सामन्यांमध्ये सीएसकेला धूळ चारली आहे. त्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने आतापर्यंत १० सामने सीएसकेविरुद्ध जिंकले आहेत. दिल्ली कॅपिट्लसने देखील सीएसकेविरुद्ध १० सामने जिंकले आहेत (Most IPL wins against CSK).
आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
२० – मुंबई इंडियन्स
१२ – पंजाब किंग्ज
१० – राजस्थान रॉयल्स
१० – दिल्ली कॅपिटल्स
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा (MI vs CSK) एकंदरीत विचार केला, तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी रोहितचा हा निर्णय अगदी योग्य ठरवला. सीएसकेचा संपूर्ण संघ १६ षटकांमध्ये आणि ९७ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य १४.५ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
महत्वाच्या बातम्या –
‘पुढच्या हंगामात सर्व ठीक होईल, चढ-उतार येत असतात’, मुंबई इंडियन्सच्या सलामीवीराचा विश्वास
IPL 2022। मुंबईविरुद्ध सीएसकेने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या, वाचा बातमी
एकदा- दोनदा नाही, तर चेन्नईने तिसऱ्यांदा मुंबईविरुद्ध केलीय निराशाजनक कामगिरी; वाचा सविस्तर