पुणे (18 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना नंदुरबार विरुद्ध पालघर यांच्यात झाला. आज झालेल्या पहिल्या सामन्यात नाशिक संघाचा पराभव झाल्याने नंदुरबार व पालघर दोन्ही संघ प्रमोशन फेरीत पोहचले होते. त्यामुळे हा सामना एक औपचारिकता होती. दोन्ही संघांच्या बचावपटूंनी जोरदार खेळ करत चढाईपटूंना रोखून ठेवले होते. पहिल्या पाच मिनिटाच्या खेळ नंतर नंदुरबार संघाकडे 5-2 अशी आघाडी होती. पण यात फक्त 1 च गुण अयशस्वी चढाईत मिळेल बोनस गुण होता तर बाकी दोन्ही संघांनी मिळवले हे गुण पकडीतील होते.
मध्यांतराला तीन मिनिटं शिल्लक असताना नंदुरबार संघाने पालघर संघाला ऑल आऊट करत 18-10 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर पालघरच्या प्रतिक जाधव मे सलग तीन चढाया करत गुण मिळवत संघांची आघाडी कमी करत मध्यांतराला सामना 14-18 असा आणला. मध्यंतरा नंतर सलग तीन चढाया करत प्रतिक जाधव ने पालघर संघाला 21-20 अशी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान नंदुरबार संघ ऑल आऊट झाला.
नंदुरबारच्या वरून खडले ने सुपर रेड करत पुन्हा एकदा नंदुरबार संघाला आघाडी वर आणले. ही आघाडी कायम ठेवत पुढे नंदुरबार संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. नंदुरबार संघाने 40-32 असा विजय मिळवला. चढाईत वरून खडले ने 13 गुण मिळवत महत्वपूर्ण खेळी केली. तर जयेश महाजन ने पुन्हा एकदा अष्टपैलू खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. जयेश ने पकडीत 6 तर चढाईत 4 गुण मिळवले. ओमकार शिंदे सुद्धा हाय फाय पूर्ण केला. तर पालघरच्या प्रतिक जाधवने केलेली 14 गुणांची खेळी व्यर्थ ठरली. (Nandurbar team tops the points table with sixth win)
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- जयेश महाजन, नंदुरबार
कबड्डी का कमाल – अभिनय सिंग व दिपनशू तांडेल, पालघर
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : शिखर धवन कर्णधार, अन् हर्षल पटेलचा वेगवान मारा, पाहा पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग 11
आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स रेडी, नेट्समध्ये सॅमसनचा शॉट पाहून चहल सदम्यात