किंग्स्टनच्या सबीना पार्कवर सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडिज तिसऱ्या कसोटीत जो काही नाट्यमय खेळ पाहायला मिळाला, तो अविश्वसनीय होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 225 धावा केल्या, तर वेस्टइंडिजचा पहिला डाव केवळ 143 धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही कामगिरी ढासळली आणि ते केवळ 121 धावांवर गारद झाले.
या आधारे वेस्टइंडिजपुढे 204 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. पण प्रत्युत्तरात वेस्टइंडिज संघाचा पूर्ण पाडाव झाला. दुसऱ्या डावात संपूर्ण संघ केवळ 27 धावा करून बाद झाला. हा कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी स्कोर ठरला.
स्टार्कने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात अवघ्या 9 धावा देत 6 बळी घेतले. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावांत 6 बळी घेणाऱ्या निवडक गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे.
10 पेक्षा कमी धावांत 6 बळी घेणारे गोलंदाज (कसोटी क्रिकेट):
6/3 – जर्मेन लॉसन (वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश, 2002)
6/7 – एगिलिगन (इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1924)
6/7 – स्कॉट बोलंड (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड, 2021)
6/8 – डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, 2013)
6/9 – मायकल क्लार्क (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, 2004)
6/9 – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025)
मिचेल स्टार्कने केवळ 15 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेत कसोटीत सर्वात जलद 5 विकेट हॉल मिळवणारा गोलंदाज बनला. वेस्टइंडिजच्या दुसऱ्या डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या, दुसरा ओव्हर मेडन टाकला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आणखी 2 विकेट्स मिळवले.
याच सामन्यात त्याने कसोटीतील आपला 400 वा विकेटही पूर्ण केला. स्टार्क हा हा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा, तर जगातील 18वा गोलंदाज ठरला आहे.
???? MITCHELL STARC REGISTERED THE FASTEST FIFER IN TEST HISTORY. ????
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 15, 2025
– 5 wickets in just 15 balls. ???????? pic.twitter.com/eV9R4lBdXe
कसोटीत सर्वात कमी चेंडूंमध्ये 5 विकेट्स:
मिचेल स्टार्क – 15 चेंडू, विरुद्ध वेस्टइंडिज
अर्नी टोशॅक – 19 चेंडू, विरुद्ध भारत
स्टुअर्ट ब्रॉड – 19 चेंडू, विरुद्ध ऑस्ट्रेलिया
स्कॉट बोलंड – 19 चेंडू, विरुद्ध इंग्लंड






