भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे पार पडला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल लावण्यासाठी डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला. या नियमानुसार हा सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या टी20 सामन्यातही भारताने बाजी मारली होती, तर पहिला सामना पावसामुळे नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला. अशात ही मालिका संपली आहे. या मालिकेतील जबरदस्त कामगिरीसाठी सूर्यकुमार यादव याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणजेच मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला की, “आतापर्यंत ज्याप्रकारे गोष्टी घडल्या आहेत, त्यामुळे मी भलताच खुश आहे. इथे एक पूर्ण सामना खेळून मला खूप चांगले वाटले. जसे की, सिराज म्हणाला, वातावरण आपल्या हातात नाहीये. दबाव नेहमीच असतो आणि त्यासोबतच मी फलंदाजीचा आनंद घेत आहे. मैदानावर जाऊन मी फक्त स्वत:ला व्यक्त करत आहे. मैदानावर कोणत्याही प्रकारचे ओझे ठेवत नाही. माझा दृष्टीकोण तोच राहील. संपूर्ण सामना झाला असता, तर चांगले वाटले असते, पण ठीक आहे.”
Suryakumar Yadav continued his outstanding run of form with the bat and bagged the Player of the Series award 👏👏#TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/OPmSnMFhLv
— BCCI (@BCCI) November 22, 2022
मोहम्मद सिराजचे वक्तव्य
प्लेयर ऑफ द मॅच (Player of The Match) म्हणजेच सामनावीर ठरलेल्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यानेही भाष्य केले. तो म्हणाला की, “या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. मी लेंथमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो, ज्याचा मला फायदा मिळाला. मी स्वत:ला कठीण लेंथवर गोलंदाजी करण्यासाठी तयार केले आणि विश्वचषकादरम्यान खूप सराव केला. मी आपल्या योजना अंमलात आणल्या. फक्त कठीण लेंथ गोलंदाजी करायची, हे मी समजतो. वातावरण आमच्या हातात नाहीये. मालिका विजयाने आम्ही खुश आहोत.”
सामन्याचा आढावा
भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सर्वबाद 160 धावा केल्या होत्या. यावेळी सिराजने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 9 षटकात 4 विकेट्स गमावत 75 धावा चोपल्या. नंतर पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना बरोबरीत सुटला. (nz vs ind cricketer suryakumar yadav reaction after being picked player of the series read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी घरी जातोय…’, भारताला टी20 मालिका जिंकून दिल्यानंतर कर्णधार पंड्याचे मोठे वक्तव्य
जुन्या निवड समिती बद्दल कार्तिकचे वक्तव्य; म्हणतोय,’त्यांनी खूप..’