भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा मोठे यश मिळवले. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक कर्णधार म्हणूनही त्याने अनेक यशाची शिखरे पार केली. यादरम्यान त्याने चाहत्यांना न विसरता येण्यासारखे अनेक क्षणही दिले. मात्र याचवेळी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी 30 डिसेंबर हा दिवस विसरणे कठिण आहे. कारण आजच्याच दिवशी 9 वर्षांपूर्वी (30 डिसेंबर 2014) भारताचा कर्णधार एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
त्याने 2014 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना संपल्यानंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. या सामन्यात त्याने भारताकडून दुसऱ्या डावात नाबाद 24 धावा करत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
विशेष म्हणजे धोनीने जाहीररित्या कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली नव्हती. अगदी त्याने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आल्यानंतरही तो निवृत्ती घेत असल्याचे सांगितले नव्हते.
त्याच्या निवृत्तीची बातमी बीसीसीआयकडून देण्यात आली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्याची कसोटीतील निवृत्तीची बातमी देताना लिहिले होते की ‘एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो वनडे आणि टी20 मध्ये पुढेही खेळत राहिल.’
‘भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असणाऱ्या एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला. धोनीने सर्वप्रकारचे क्रिकेट खेळण्याचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.’
News Alert – MS Dhoni has chosen to retire from Test Cricket with immediate effect #MSD #Captain
— BCCI (@BCCI) December 30, 2014
त्यावेळी भारताचा कर्णधार असणाऱ्या धोनीने चालू कसोटी मालिकेतून निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. धोनीने जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बाकी होता.
पण त्याआधीच धोनीने निवृत्ती घेतल्याने सिडनीत झालेल्या शेवटच्या कसोटीत विराट कोहलीने भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर विराटला कसोटीचा नियमित कर्णधार करण्यात आले. त्या मालिकेत भारताने 2-0 अशा फरकाने पराभव स्विकारला होता. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना धोनी दुखापतीमुळे खेळला नव्हता.
तसेच खास गोष्ट म्हणजे धोनीने ज्यादिवशी निवृत्ती घोषित केली होती. त्या रात्री तो कसोटी जर्सीमध्येच झोपला होता, याचा खूलासा सुरेश रैनाने एका मुलाखतीत केला होता.
धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका द्विशतकाचा, 5 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने यष्टीमागे कसोटीत 294 विकेट्स घेतल्या आहेत.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |
धोनीने भारताचे कसोटीत 60 सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील 27 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 18 सामन्यात भारताने पराभव पत्करला आहे. राहिलेले 15 सामने अणिर्नित होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैद्राबाद एफसीचा दणदणीत विजय; नॉर्थ ईस्ट युनायटेडला नमवत पुन्हा अव्वल नंबर
ब्रेकिंग! रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; कार संपूर्ण जळाली, पंतचा पाय मोडल्याची भीती