इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ज्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तर दुसरा कसोटी सामना गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. दरम्यान, इंग्लंडमधील मैदानात आणि तेथील वातावरणात फलंदाजांना उत्तम खेळी करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.
अशात दोन्ही कसोटी सामन्यात इंग्लंडच्या वातावरणात समरूप होऊन भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने अत्यंत उत्कृष्ट खेळी करत कसोटी संघातील त्याच्या स्थानाची दावेदारी दाखवून दिली. त्यातच लॉर्ड्सच्या मैदानावर शतकी खेळी करत केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ६ वे शतक ठोकले. तसेच लॉर्डच्या मैदानावर तब्बल ३१ वर्षांनी भारताच्या सलामीवीराने शतक ठोकले. असे करत त्याने लॉर्डच्या ‘ऑनर बोर्डा’वर आपल्या नावाची नोंदणी करून घेतली.
असे असले तरी, राहुलला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला होता. राहुलला तब्बल २ वर्षांनंतर भारतीय संघात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. एक वेळ होती जेव्हा राहुल त्याच्या घरातून १-२ नव्हे तर तब्बल १४ दिवस बाहेर निघत नव्हता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता.
राहुल आणि हार्दिक पंड्यावर २०१९ साली एका कार्यक्रमा दरम्यान महिलांशी संबंधित अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या दोघांना भारतीय नियामक मंडळाने काही काळासाठी निलंबित देखील केले होते. या गोष्टीचा राहुलच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे राहुल यादरम्यान पूर्ण नैराश्यात गेला होता.
नंतर एका वर्षांनी त्याच्यावरील निलंबन हटवण्यात आले, परंतु मानसिकरित्या तो त्याच गोष्टींमध्ये काहीकाळ गुंफला होता. याचा परिणाम त्याच्या खेळावर सुद्धा दिसून येत होता. वेस्ट इंडिजचा दौर्यावर दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला एकाही डावात अर्धशतक करता आले नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. परंतु, राहुल टी-२० सामन्यांसाठी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघात कायम होता. परंतु कसोटी संघातून त्याला वगळल्यामुळे तो निराश झाला होता.
मात्र दोन वर्षानंतर राहुलला इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मालिकेपूर्वी शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने त्याने नाव मागे घेतले. त्यानंतर सरावादरम्यान मयंक अगरवाल दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला संघात सलामी फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८४ धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत १२९ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
–‘टेक ऑफ टू युएई’! मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबुधाबीला रवाना, सीएसकेचा संघही दुबईत दाखल, पाहा व्हिडिओ
–वॉन-जाफर यांच्यातील ‘कोल्डवॉर’ अद्यापही सुरुच; भारतीय क्रिकेटरकडून पुन्हा माजी कर्णधार ट्रोल
–ऑस्ट्रेलियाला बसणार मोठा धक्का? चक्क नियमित कर्णधारच टी२० विश्वचषकात न खेळण्याची शक्यता